पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या माढ्यात काय होणार? EXIT POLL चा अंदाज समोर

पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या माढ्यात काय होणार? EXIT POLL चा अंदाज समोर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी खेळत संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचले आणि उमेदवारी दिली.

  • Share this:

माढा, 20 मे : माढा लोकसभा मतदारसंघाकडे भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष प्रतिष्ठेची लढाई म्हणून बघत आहेत. रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी खेळत संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचले आणि उमेदवारी दिली.

शरद पवार यांच्या या खेळीमुळे भाजपसमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर भाजपने काँग्रेसमधून आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या पार्श्वभूमीवर माढ्यात आता जोरदार लढत रंगली.

मतदान संपल्यानंतर आता वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. न्यूज18 च्या एक्झिट पोलनुसार माढ्यामध्ये राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे विजयी होतील. त्यामुळे भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाबाबतही एक्झिट पोलमधून अंदाज समोर आला आहे.

महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

भाजप - 21 ते 23

शिवसेना - 20 ते 22

काँग्रेस - 0 ते 1

राष्ट्रवादी - 3 ते 5

एकूण :

महायुती - 42 ते 45

महाआघाडी - 4 ते 6


VIDEO: पार्थ पवारांचं काय होणार? शेकाप नेते जयंत पाटील म्हणतात...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2019 12:38 PM IST

ताज्या बातम्या