बीडमध्ये बजरंग सोनवणे जाएंट किलर ठरणार की मुंडे गड राखणार? EXIT POLL चा अंदाज समोर

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मुलगी प्रीतम मुंडे यांनी इथे सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचं रेकॉर्ड केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 11:53 AM IST

बीडमध्ये बजरंग सोनवणे जाएंट किलर ठरणार की मुंडे गड राखणार? EXIT POLL चा अंदाज समोर

बीड, 20 मे : बीडची लोकसभेची जागा सगळ्यात जास्त मताधिक्याने विजय मिळवून देणारी जागा मानली जाते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मुलगी प्रीतम मुंडे यांनी इथे सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचं रेकॉर्ड केलं होतं.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना 9 लाख 22 हजार 416 मतं मिळाली. त्या 6 लाख 96 हजार 321 मताधिक्य मिळवून निवडून आल्या होत्या.

या निवडणुकीतही भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना तिकीट दिलं. वंचित बहुजन आघाडी आणि बसपानेही इथे उमेदवार उतरवले आहेत. या सगळ्या उमेदवारांना टक्कर देत प्रीतम मुंडे बीडमधून पुन्हा विजयी होणार का ? याची जोरदार चर्चा आहे.

मतदानानंतर आता एक्झिट पोल समोर आले आहेत. या पोलमधून देशभरातील मतदारसंघांबाबतचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. न्यूज18 च्या एक्झिट पोलनुसार बीडमध्ये राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागेल. त्यामुळे प्रीतम मुंडे पुन्हा एकदा बाजी मारतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई, माजलगाव, आष्टी, केज, परळी या विधानसभा मतदारसंघांवर भाजपचं वर्चस्व आहे तर बीड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. बीडमध्ये याही निवडणुकीत महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या बहीणभावांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली.

Loading...


VIDEO: पार्थ पवारांचं काय होणार? शेकाप नेते जयंत पाटील म्हणतात...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2019 11:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...