घोटभर पाण्यासाठी जिवाची बाजी ! महिला खोल विहिरीत उतरून काढतात पाणी

राज्यात दुष्काळाचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. दुष्काळामुळे नागरिकांना जगणं कठिण झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 02:57 PM IST

घोटभर पाण्यासाठी जिवाची बाजी ! महिला खोल विहिरीत उतरून काढतात पाणी

नरेंद्र मेटे, वर्धा, 5 जून : राज्यात दुष्काळाचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. दुष्काळामुळे नागरिकांना जगणं कठिण झालं आहे. कारंजा तालुक्यात मध्यम दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. पण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील 40 गावांत पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांत प्रशासनाने विहिरी-बोअरवेल अधिग्रहण केलं आहे, तरीही पाण्याची समस्या कायमच आहे.

गावाबाहेरील शेत शिवारात विहिरींना पाणी नाही. गावात सार्वजनिक विहीर आहे. पण या विहिरीला केवळ डबा भरेल तेवढंच पाणी आहे. त्यातही नंबर लावून विहिरीत उतरावे लागते. महिला-मुली खोल विहिरीत उतरून डब्यानं पाणी काढून गुंड भर पाणी भरतात. लोकांना घरासमोर ड्रमच्या रांगा लावून टँकरची वाट पाहावी लागते. अनेकांनी पाणी टंचाई असल्याने ड्रम नव्याने विकत घेतले आहेत. दररोज ड्रम घरासमोर ठेवून टँकरनं पाणी भरण्यात बऱ्याच जणांचा संपूर्ण दिवस खर्च होतो.

'50 रुपये द्या ड्रमभर पाणी घ्या'

तालुक्यातील लोकांना येणगाव येथे पाण्यासाठी दुसऱ्या गावात जाऊन पाणी आणावे लागत आहे. प्रत्येक घराला दिवसाला 200 रुपयाचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. गावात खासगी टँकर लावण्यात आले आहेत. टँकर मालकाकडून लोकांना एक ड्रम तब्बल 50 रुपयात घ्यावे लागत आहे. पण ज्यांच्याकडे पाण्यासाठी पैसा नाही अशी लोकं डोक्यावरून, बाईक, सायकलनं पाणी वाहून आणतात. येणगाव हे गाव उत्तर वाहिती नदीवर वसलेलं आहे. त्यात याच नदीवर हेमाडपंथी जलदेवीचे मंदिर आहे, कधीकाळी जलदेवी मंदिरात शिवलिंग होते. येथे आपोआप पाणी यायचे आणि निघून जात असायचे.

चैत्र महिन्यात येथे बाहेर गावातील कुटुंब जेवणाचे कार्यक्रम ठेवत असत. तेव्हा नदीतल्या पाण्याचा स्वयंपाकासाठी वापर केला जायता. आता दुर्दैवानं येथे विकत पाणी आणून स्वयंपाक करावे लागत आहे. मंदिर असल्याने येथे पाणीच पाणी राहायचे आता यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली असून गावशेजारील पिपरी गावातून पाणी आणावे लागत आहे. तालुक्यातील गारपीट, खापरी, खरसखंडा मोर्शी चोपण या गावात टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे, मात्र प्रशासन उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा काम करत आहे. तालुका टँकर मुक्त दाखवण्याच्या नादात अधिग्रहणवर भर दिला जात आहे. जमिनीत पाण्याचा स्रोत नाही आणि नव्याने बोअरवेल केला जात आहे. पण पाणी लागत नसून त्याचा देखावा करून नागरिकांचे दुर्लक्ष करत, गावात डिसेंबर महिन्यापासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्राम पंचायत स्तरावरून पाणी समस्या आढावा घेऊन प्रशासन प्रस्ताव मांडणे आवश्यक होते. मात्र पाणी टंचाई नसल्याचे सांगून दिशाभूल करण्यात आली आहे. शासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे गरजेचे असताना पाणी पुरवठा बगल देत आहे. येनगाव येथील घर कुटुंब 250 लोकसंख्या 1200 आहेत. गावात पाच सार्वजनिक विहीर आहे. दोन कुपनलिका आहे, मात्र सगळ्याच कोरड्या झाल्या आहे. त्यामुळे यावर्षी गावात पाण्याचा हाहाकार सुरू झाला असल्याने दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे. प्रत्येक दिवसाला जवळपास खासगी टँकरद्वारे गावात पाणी विकत घेऊन तहान भागवली जात आहे. जवळपास 12 टँकर दररोज नागरिक विकत घेत आहे. जवळपास दहा हजार रुपयांचा प्रत्येक दिवसाला नागरिकांच्या खिशाला भुदंड बसत आहे . या गावात जलदेवी प्रस्थान आहे. कधीही या गावात पाणी टंचाई निर्माण झाली नव्हती. मात्र यावर्षी येथे पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.

Loading...


VIDEO: दूध उत्पादकांसाठी खुशखबर! 8 जूनपासून लागू होणार नवे दर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 02:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...