S M L

आज 59वा महाराष्ट्र दिन; राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन

1 मे, 1960 रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

Chittatosh Khandekar | Updated On: May 1, 2018 06:32 AM IST

आज 59वा महाराष्ट्र दिन; राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन

01 मे: मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा अशा शब्दात ज्या राज्याचा गौरव केला जातो त्या महाराष्ट्र राज्याचा आज स्थापना दिन . 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. मराठी भाषिकांचं राज्य म्हणून निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या स्थापना दिनाबद्दल विविध कार्यक्रमांचं आयोजन आज राज्यभर करण्यात आलं आहे.

1960साला पर्यंत महाराष्ट्र आणि गुजरात हे द्विभाषिक राज्य होतं. त्यानंतर मात्र कालांतराने स्वतंत्र महाराष्ट्राची मागणी जोर धरु लागली. यात अनेकांनी मुंबईसह महाराष्ट्रची मागणी केली. तर मोरारजी देसाई यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करुन गुजरातमध्ये सामील करण्याची मागणी केली. देसाईंच्या या मागणीला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. मुंबईचा समावेश महाराष्ट्रात व्हावा यासाठी मोठा संघर्षही झाला. या संघर्षात सर्वात मोठा वाटा हा गिरणी कामगारांचा होता. या संघर्षानंतर 1 मे, 1960 रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०५ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केलं जातं. आज मुंबईतील हुतात्मा स्मारकावर जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शहिदांना आदरांजली वाहिली जाईल. आजचा दिवस कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2018 06:32 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close