News18 Lokmat

विधानसभेसाठी काँग्रेस नेत्यांच्या बैठका, आमदारांची मात्र पाठ

बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या नेत्यांमधले काही नेते काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत अशीही चर्चा आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 07:46 PM IST

विधानसभेसाठी काँग्रेस नेत्यांच्या बैठका, आमदारांची मात्र पाठ

सागर कुलकर्णी, मुंबई 14 जून :  विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केलीय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व सूत्रं आपल्या हाती घेत झाडाझडतीला सुरुवात केलीय. काँग्रेसच्या नेत्यांनीही बैठका घ्यायला सुरुवात केलीय मात्र या बैठकींना आमदारांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. बैठकांना आमदारच येत नसल्याने काँग्रेसच्या बड्या नेत्यांची चिंता वाढली आहे. या आमदारांना एकत्र कसं ठेवायचं असा पेच या नेत्यांना पडलाय. लोकसभेतल्या पराभवाने खचलेल्या काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळलाय. प्रदेशाध्यक्ष आणि पक्षप्रभारी या दोनही नेत्यांचा पराभव झाल्याने सर्वच पक्षात आलबेल आहे. कोणी कोणाला जाब विचारायचा असा प्रश्न निर्माण झालाय. मात्र यातून सावरण्याचा प्रयत्न करण्यासाठी वरिष्ठ नेते बैठका घेतायत तर त्यांच्याकडे आमदारच फिरकत नसल्याचं उघड झालंय.

महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे,  प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यासह दिग्गज नेते गेली दोन दिवस बैठका घेत आहेत. मात्र या बैठकांना महत्त्वाच्या आमदारांनीच पाठ फिरवलीय. वैयक्तिक कारणं देत अनेक आमदार या बैठकांना गैरहजर राहिले आहेत. या नेत्यांमध्ये विश्वजित कदम, सतेज पाटील, भारत भालके, संजय निरूपम सारख्या नेत्यांचा समावेश आहे.

पाठ फिरवणाऱ्या नेत्यांमधले काही नेते काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत अशीही चर्चा आहे. मुंबई विभागाच्या बैठकीसाठी मिलींद देवरा, प्रिया दत्त, उर्मिला मांतोडकर बैठकीस होते उपस्थित पण निरूपम यांनी मुंबईत असून खरगेंच्या बैठकीकडे पाठ फिरवली.

वंचित करणार विस्तार

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. लोकसभा निवडणुकीत नव्याने तयार झालेल्या वंचित आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला काही मतदारसंघात धक्का दिला. तर औरंगाबाद सारख्या मतदारसंघात त्यांनी उमेदवार देखील निवडूण आणला. प्रकाश आंबेडकरांच्या ( Prakash Ambedkar)) नेतृत्वाखाली तयार झालेली वंचित आघाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न करत असताना आंबेडकरांनी एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात वंचित आघाडीमुळे निवडणुकीच्या निकालाचे चित्र बदलणार आहे.

Loading...

लोकसभा निवडणुकीत वंचितला केवळ एकच जागा मिळाली असली तरी त्यांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अनेक जागांवर पराभव स्विकारावा लागला आहे. एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीचा मेगाप्लॅन सांगितला. वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहोत. राज्यातील वंचित घटकाचा आम्ही आवाज होऊ. सध्या राज्यात पाणी टंचाई आहे. हाच मुद्दा आम्ही निवडणुकीत उपस्थित करू, कारण विरोधकांना कधीच हा प्रश्न लावून धरता आला नाही. निवडणुकीच्या आधी मतदारांना आमचे व्हिजन सांगू आणि त्याआधारेच मतदान करण्याचे आव्हान करू. इतकच नव्हे तर लवकरच वंचित आघाडी संपूर्ण देशभरात विस्तार करणार असल्याचे आंबेडकरांनी सांगितले. आमची वेळ आली आहे, असे सांगण्यास ते विसरले नाहीत.



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2019 07:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...