मिशन विधानसभा ! 'फिर एक बार शिवशाही सरकार', मुख्यमंत्री काढणार रथयात्रा

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजपनं आता राज्यातील विधानसभा निवडणुकीतही अभूतपूर्व विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 07:02 PM IST

मिशन विधानसभा ! 'फिर एक बार शिवशाही सरकार', मुख्यमंत्री काढणार रथयात्रा

मुंबई, 22 जून : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजपनं आता राज्यातील विधानसभा निवडणुकीतही अभूतपूर्व विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रथयात्रा काढणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 'फिर एक बार शिवशाही सरकार' आणि 'अब की बार 220 के पार' या टॅगलाइनसह रथयात्रा काढण्यात येणार आहे.  याबाबत माहिती देताना पाटील म्हणाले की ,'ऑगस्ट महिन्यामध्ये मुख्यमंत्री विकासयात्रा काढणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ही यात्रा काढणार आहेत. तसंच शिवसेना-भाजपची सर्व 288 जागांसाठी तयारी सुरू आहे'.

दरम्यान, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांबाबतचा प्रश्न केंद्रीय नेतृत्व ठरवेल, अशी माहिती देखील यावेळेस चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Loading...

पाहा अन्य बातम्या

VIDEO :...तर तुमची दुकानं बंद करून टाकू, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

VIDEO: 'मुख्यमंत्री भाजपचाच होणार'; कार्यकर्त्यांची भावना!

शेतकऱ्यांना दिलासा, बीडमध्ये कर्परा नदीला पूर

VIDEO : रुग्णालयात झोपलेले असताना शर्टात घुसला साप, तरीही आजोबा ढाराढुर झोपले!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...