विरोधकांना त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत आणि भाजपला दोष देतात - फडणवीस

विरोधकांना त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत आणि भाजपला दोष देतात - फडणवीस

लोकांशी नाळ तुटल्यामुळे विरोधी पक्षांचा लाजीरवाणी पराभव झाला.

  • Share this:

मुंबई 16 जून : महाराष्ट्राच्या विधानसभेचे शेवटचं अधिवेश उद्यापासून म्हणजे सोमवारपासून सुरू होतेय. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. भाजप  विरोधी पक्ष फोडत असल्याच्या आरोपावर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधकांना आपले लोक सांभाळता येत नाहीत. त्यांच्या नेत्यांचा त्यांच्या पक्षनेतृत्वावर विश्वास नाही असं असताना त्यांनी उगाच भाजपला दोष देऊ नये असा टोलाही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला.भाजपच्या सकारात्मक राजकारणाकडे पाहुल विरोधी पक्षातले लोक भाजपमध्ये येत आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले. विरोधी पक्षांची जनतेशी नाळ तुटली आहे. त्यांचा लोकांशी जनसंपर्क राहिलेला नाही त्यामुळेच त्यांचा लाजीरवाणा पराभव झाला अशी टीकाही त्यांनी केली. या पराभवातून ते काहीही शिकले नाहीत असंही ते म्हणाले.

शिवसेनेची मागणी नाही.

शिवसेनेने काहीही मागतिलं नाही. त्यांनी दोन मंत्र्यांना घ्या असं सांगितलं आम्ही त्यांना घेतलं. उपमुख्यमंत्रीपदची चर्चा कुणीही केलेली नाही. ही चर्चा फक्त माध्यमातच झाली असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेनं उपमुख्यमंत्री पद मागितलं होतं का या प्रश्नावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री?

- पंतप्रधान किसान योजने अंतर्गत 1 कोटी 30 लाख शेतकऱ्यांना लाभ देणार

- शेतकऱ्याना यंदा 4700 कोटीचे अनुदान देण्यात येईल.

- आज संध्याकाळी खातेवाटप जाहीर केल्या जाईल

- लोकसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ पक्ष अधिवेशनाला सामोरं जातोय

- दुष्काळा संदर्भात चर्चा होईल - १३ नवीन विधेयकं मांडली जातील - १५ प्रलंबित विधेयकं आहेत - एकूण २८ विधेयकं असतील

- ४७०० कोटींचे शेतकऱ्यांना अनुदान - ३२०० कोटी रुपये विम्याचे दिले आहेत.

- चारा छावण्यांचे प्रती जनावर दर वाढवलेत - पाण्याचे टॅंकर्स दिलेत - पण चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार करु दिला नाहीये - पीएम किसान योजना १ कोटी ३० लाख शेतकऱ्यांना लाभ देणार आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 05:12 PM IST

ताज्या बातम्या