News18 Lokmat

सूर्याकडे बघून थुंकाल तर ते कुठे पडेल? मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

'काँग्रेस पक्षाला शरद पवार सारखे वकील लाभले आहेत, पवारांना वकिली केल्याशिवाय पर्याय नाही.'

News18 Lokmat | Updated On: Dec 31, 2018 03:41 PM IST

सूर्याकडे बघून थुंकाल तर ते कुठे पडेल?  मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

मुंबई 31 डिसेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर सेनेला सूचक इशारा दिलाय. शिवसेनेचे आरोप आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर देऊ, माझ्या उत्तराची वाट बघा असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी दिवसरात्र काम करताहेत. ते काय आहेत याची देशातल्या लोकांना चांगली माहिती आहे. त्यामुळे सूर्याकडे बघून थुंकण्याचा प्रयत्न करू नका, असं केलं तर ते कुठे पडेल? असा प्रश्न विचारत त्यांनी शिवसेनेला शालजोडीतून लगावलाय.


गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि सामनाच्या अग्रलेखांमधून राज्य, केंद्र सरकार, नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली जातेय. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा इशारा महत्त्वाचा मानला जातोय. ऑगस्टा वस्टलँड प्रकरणातला आरोपी ख्रिश्चियन मिशेल यांनी दिलेल्या जबाबात मिसेस गांधी असा उल्लेख केल्याचं पुढं आलंय.


यामुळे राहुल गांधी यांनी त्यावर उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातला भ्रष्टाचार हेच त्यांच्या पत्रकार परिषदेचा मुख्य विषय होता.

Loading...

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे


- VVIPसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदीमध्ये मोठा घोटाळा

- काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष चालवणाऱ्या परिवाराने उत्तरं द्यावीत

- 1999 ला हेलिकॉप्टर खरेदी चा निर्णय

- सरकार बदललं, त्यानंतर टेंडर काढण्यात आलं.

- अगस्ता 12 हेलिकॉप्टर साठी 3 हजार 200 कोटीचं टेंडर देण्यात आलं.


- राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तिंसाठी हे हेलिकॉप्टर वापरण्यात येणार होते.

- सीबीआयच्या कारवाईत अनेक अधिकाऱ्यांना लाच दिल्याचं उघड झालं.

- इटली च्या न्यायालयातही काहींना शिक्षा

- 193 आणि 204 पान वर सोनिया गांधी यांचं नाव आलं आहे.


- 10 टाक्यांनी 125 कोटीचं कमिशन देण्यात आलंय, 52 टक्के काँग्रेस नेते, 18 टक्के अधिकारी , 20 टक्के एअर फोर्स ला लाच दिली गेली.

- इटालियन अधिकारी यांना काही नावं मिळालीत.

- सोनिया गांधी, आर , ए. पी. फॅमिली अशा नावांचा उल्लेख आलाय, मिशेल ला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी मध्ये या सर्व गोष्टी समोर येत आहेत.


- काँग्रेस पक्षाला शरद पवार सारखे वकील लाभले आहेत, पवारांना वकिली केल्याशिवाय पर्याय नाही.


- शिवसेच्या आरोपांना आम्ही महत्त्व देत नाही, देशांचा विश्वास पंतप्रधानांवर आहे.

- सूर्याकडे बघून थुंकाल तर ते कुठे पडेल? मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला.

'काँग्रेसनं ऑगस्टा वेस्टलँड संदर्भात उत्तरं द्यावी', मुख्यमंत्र्यांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2018 03:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...