News18 Lokmat

शरद पवारांना काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही - मुख्यमंत्री

पंतप्रधान काय आहेत याची देशातल्या लोकांना चांगली माहिती आहे. त्यामुळे सूर्याकडे बघून थुंकण्याचा प्रयत्न करू नका,

News18 Lokmat | Updated On: Dec 31, 2018 04:15 PM IST

शरद पवारांना काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही - मुख्यमंत्री

मुंबई 31 डिसेंबर : निवडणुका जशा जवळ येतात तसं नेत्यांच्या टोलेबाजीला वेग येते. प्रत्येक नेता आपली पुढची गणितं लक्षात घेत वक्तव्य करत असतो. साताऱ्यात झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया आणि राहुल गांधींची स्तुती केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर मिश्किल टिप्पणी केलीय. "काँग्रेसला आता शरद पवारांसारखा वकिल लाभलाय, त्यांना काँग्रेसची वकिली केल्याशिवाय पर्याय नाही." असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं. यामुळं आता नव्या वर्षात राजकीय पक्षांमधले आरोप-प्रत्यारोप वाढत जाणार याचे हे संकेत  आहेत


शिवसेनेवर काय म्हणाले मुख्यमंत्री?


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर सेनेला सूचक इशारा दिलाय. शिवसेनेचे आरोप आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर देऊ, माझ्या उत्तराची वाट बघा असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी दिवसरात्र काम करताहेत.

Loading...


पंतप्रधान काय आहेत याची देशातल्या लोकांना चांगली माहिती आहे. त्यामुळे सूर्याकडे बघून थुंकण्याचा प्रयत्न करू नका, असं केलं तर ते कुठे पडेल? असा प्रश्न विचारत त्यांनी शिवसेनेला शालजोडीतून लगावलाय.


मुख्यमंत्र्याच्या पत्रकार परिषदेले महत्त्वाचे मुद्दे


- VVIPसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदीमध्ये मोठा घोटाळा

- काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष चालवणाऱ्या परिवाराने उत्तरं द्यावीत

- 1999 ला हेलिकॉप्टर खरेदी चा निर्णय

- सरकार बदललं, त्यानंतर टेंडर काढण्यात आलं.

- अगस्ता 12 हेलिकॉप्टर साठी 3 हजार 200 कोटीचं टेंडर देण्यात आलं.

- राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तिंसाठी हे हेलिकॉप्टर वापरण्यात येणार होते.

- सीबीआयच्या कारवाईत अनेक अधिकाऱ्यांना लाच दिल्याचं उघड झालं.

- इटली च्या न्यायालयातही काहींना शिक्षा

- 193 आणि 204 पान वर सोनिया गांधी यांचं नाव आलं आहे.

- 10 टाक्यांनी 125 कोटीचं कमिशन देण्यात आलंय, 52 टक्के काँग्रेस नेते, 18 टक्के अधिकारी , 20 टक्के एअर फोर्स ला लाच दिली गेली.

- इटालियन अधिकारी यांना काही नावं मिळालीत.

- सोनिया गांधी, आर , ए. पी. फॅमिली अशा नावांचा उल्लेख आलाय, मिशेल ला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी मध्ये या सर्व गोष्टी समोर येत आहेत.

- काँग्रेस पक्षाला शरद पवार सारखे वकील लाभले आहेत, पवारांना वकिली केल्याशिवाय पर्याय नाही.

- शिवसेच्या आरोपांना आम्ही महत्त्व देत नाही, देशांचा विश्वास पंतप्रधानांवर आहे.

- सूर्याकडे बघून थुंकाल तर ते कुठे पडेल? मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2018 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...