राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे केली मागणी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2017 10:56 AM IST

राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांची मागणी

24 एप्रिल : विदर्भ आणि मराठवाडयातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि दुष्काळी भागात विविध येाजना राबविण्यासाठी विशेष निधी केंद्रने द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 10 हजार 684 कोटी रूपयांच्या विशेष पॅकेजची मागणी केली.

राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 'नीती आयोगा'च्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली. मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या बैठकीला प्रमुख केंद्रीय मंत्र्यांसह देशातील सर्व मुख्यमंत्री सहभागी झाले होते.

'सलगच्या दुष्काळामुळे राज्यातील शेतीवर ताण आला आहे. तरीसुद्धा शेतीमधील वाढवलेली गुंतवणूक, जलयुक्त शिवारचे यश आणि अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करण्याचा प्रयत्नांमुळे गेल्या वर्षभरात कृषी विकासदर 12.5 टक्क्यांवर पोचला. हीच गती कायम ठेवण्यासाठी दुष्काळग्रस्त भागांतील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी केंद्राने 10 हजार 684 कोटींचे पॅकेज द्यवं. त्यातून दुष्काळावर कायमस्वरूपी मात देणं शक्य होईल.', अशी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्याने 107 योजना आखल्या आहेत. तसंच, दुष्काळाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी राज्य सरकराने  सविस्तर योजना तयार केली आहे. यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव राज्याने केंद्राकडे सादर केला आहे. यास केंद्राने मंजुरी द्यावी, अशी विनंती या बैठकीत करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 10:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...