News18 Lokmat

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या, गळफास घेऊन संपवलं आयुष्य

सततच्या छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 7, 2019 10:58 AM IST

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या, गळफास घेऊन संपवलं आयुष्य

बीड, 7 मे : सततच्या छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने सोमवारी (7 मे) रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील ही घटना आहे. याप्रकरणी दोन तरुणांवर विनयभंग आणि पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतलं आहे.

वैष्णवी अशोक लव्हारे (वय 16 वर्ष)असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे. नुकतीच तिने दहावीची परीक्षा दिली होती. गावातील अमित साहेबराव माने (वय 19 वर्ष)हा रोहन गोविंद फड (वय 19 वर्ष) याच्या मदतीने वैष्णवीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. सातत्याने बाईकवरून तिच्यामागे चकरा मारून पाठलागही तो करत होता.

वाचा :SPECIAL REPORT : आंतरजातीय विवाह करणं पाप आहे का?

हे दोघंही इथंवरच थांबले नाहीत. त्यांनी वैष्णवी आणि तिच्या वडिलांना धमक्या देत मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. अखेर या त्रासाला कंटाळून वैष्णवीने सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घरामध्ये गळफास घेतला.

वाचा :VIDEO: सेना-भाजप पदाधिकाऱ्यांनी चक्क तलवारीनं कापला केक

Loading...

याची माहिती मिळताच वैष्णवीच्या कुटुंबीयांनी तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

वैष्णवीचे वडील अशोक अंबाजी लव्हारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात अमित माने आणि रोहन फड या दोघांवर विनयभंग आणि पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

VIDEO :...तर त्यात वावगं काय? प्रिया बापट भडकली ट्रोलकऱ्यांवर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2019 10:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...