मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला काय मिळणार? मुनगंटीवारांनी केला खुलासा

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला काय मिळणार? मुनगंटीवारांनी केला खुलासा

राज्याच्या मंत्रिमंडळात काही जागा शिल्लक आहेत. गेल्या काही वर्षांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलं जातंय.

  • Share this:

मुंबई 11 जून : राज्यातला बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. या विस्तारात शिवसेना आणि मित्रपक्षांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणं प्रतिनिधीत्व मिळेल असंही ते म्हणाले. लवकरच सगळ्यांना गोड बातमी मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्याच्या मंत्रिमंडळात काही जागा शिल्लक आहेत. गेल्या काही वर्षांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलं जात होतं. असं गाजर दाखवून असंतुष्टांना शांत ठेवण्याची ही राजकीय खेळी होती असंही बोललंय जातंय.

या मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश होतो का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच विजयसिंह मोहिते पाटील यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.भाजपची साथ

या दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपची वाट धरली. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले.

त्याचरोबर विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

नवा प्रदेशाध्यक्ष कोण?

मंत्रिमंडळ विस्तारासोबतच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याचीही चर्चा आहे. रावसाहेब दानवे हे केंद्रात मंत्री झाल्यामुळे भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे.

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचा हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा आहे. लोकसभेमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपची विधानसभेची तयारी सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 03:11 PM IST

ताज्या बातम्या