अखेर ठरलं...या तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

अखेर ठरलं...या तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

विखे यांच्यासोबत काँग्रेसमधले त्यांचे काही समर्थक आमदारही भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 11 जून :  विधानसभा निवडणुकींचं आव्हान फत्ते करण्यासाठी मुंबई आणि दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता मुंबईत हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री अतिंम योजना तयार करत आहेत. हा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार 14 जून रोजी होण्याची शक्यता आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

याच संदर्भात चर्चा करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत सुजय विखेही होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

विखे यांच्यासोबत काँग्रेसमधले त्यांचे काही समर्थक आमदारही भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना कसं सामवून घ्यायचं, पुढती रणनीती काय असेल अशा सगळ्या मुद्यांची या बैठकीत चर्चा झाली अशी माहितीही सुत्रांनी दिलीय. या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि संकटमोचक गिरीश महाजन हेही सहभागी झाले होते.

विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणखी एक जोरदार धक्का देण्याच्या तयारीत मुख्यमंत्री आहेत असंही बोललं जातंय.

फडणवीस मोदी चर्चा

मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या सात जागा रिक्त आहेत त्याचं नेमकं काय करायचं यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत तीन पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

 या तीन पर्यायांवर झाली चर्चा

1)  नव्यांना संधी देत मंत्रिमंडळाच्या रिक्त जागा भरणं

2) मंत्रिमंडळ फक्त फेरबदल करणं

3) आणि जैसे थे स्थिती कायम ठेवणं

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून आमदार संजय कुटे आणि अतुल सावे यांना संधी मिळण्याची शक्यताही व्यक्त केलीय जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 03:48 PM IST

ताज्या बातम्या