बोंड अळीला कारणीभूत ठरलेल्या 90 बियाणं कंपन्यांना 1200 कोटींचा दंड!

बोंड अळीला कारणीभूत ठरलेल्या 90 बियाणं कंपन्यांना 1200 कोटींचा दंड!

हा दंड वसूल करुन राज्यातल्या अडचणीत सापडलेल्या साडे अकरा लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 5 ऑक्टोबर : महाराष्ट्रात दर्जाहिन बीटी बियाणं पुरवल्याबद्दल बहुराष्ट्रीय कापूस बियाणं कंपन्यांना 1200 कोटी रुपयांच्या दंडाची नोटिस कृषी विभागानं बजावलीय. जवळपास 90 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना कृषी खात्यानं दर्जाहिन कापूस बियाणं पुरवल्याबद्दल हानोटिस पाठवल्यात. हा दंड वसूल करुन राज्यातल्या अडचणीत सापडलेल्या साडे अकरा लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

गेल्यावर्षी आणि यंदा बीटी कापसावर आलेल्या बोंड अळीच्या प्रादुर्भावानं महाराष्ट्रातल्या कापूस शेतीचं अंदाजे 10 ते 15 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. 'बीजी-टू' वाणाचं कापूस बियाणं बोंड अळीच्या प्रादुर्भावाला बळी पडलंय. या कापूस बियाण्यामुळं महाराष्ट्रातलं अंदाजे 50 टक्क्यांपेक्षा जास्त कापूस पिकाचं गेल्या हंगामात नुकसान झालं होतं. अंदाजे 15 हजार कोटी रुपयांचा कापूस बोंड अळीनं फस्त केला होता.

बीटी तंत्रज्ञानाच्या स्विकारानंतर जवळपास 16 वर्षानंतर कापसावर पुन्हा बोंड अळीनं हल्ला केला होता. अंदाजे 22 लाख हेक्टरवरील कापूस पीक बाधित झालं होतं, त्याचबरोबर यंदासुद्धा बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं कापूस उत्पादक चिंतेत सापडलाय.

 पुण्यातील होर्डिंग दुर्घटनेचे भीषण PHOTOS

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2018 10:03 PM IST

ताज्या बातम्या