मुख्यमंत्र्यांचा दावा चंद्रकांत पाटीलांनी खोडला, मुख्यमंत्रिपदाचं अजुन ठरलं नाही

मुख्यमंत्र्यांचा दावा चंद्रकांत पाटीलांनी खोडला, मुख्यमंत्रिपदाचं अजुन ठरलं नाही

संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या दबावापुढे झुकत भाजपनं नमती भूमिका तर घेतली नाही ना? अशी चर्चा आता सुरु झालीय.

  • Share this:

मुंबई 24 जुलै : 'मुख्यमंत्रीपदाबाबत आमचं ठरलंय'चा दावा करणाऱ्या भाजपचं पितळ उघडं पडलंय. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकत असताना दुसरीकडे शिवसेनेचाही मुख्यमंत्री मीच अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांनी केली होती. मात्र आता मुख्यमंत्री कुणाचा हे अजून ठरायचंय अशी कबुली चंद्रकांत पाटलांनी दिलीय. मुख्यमंत्री अमित शाह ठरवतील असंही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस हे पुढचाही मुख्यमंत्री मीच असणार असे स्पष्ट संकेत देत होते. त्यालाच चंद्रकांत पाटील यांनी छेद दिल्याचं बोललं जातंय.

'माझी सही खोटी', मॉब लिंचिंगबदद्ल मोदींना लिहिलेल्या पत्राबाबत मणिरत्नम यांचा खुलासा

शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकांआधी आदित्य ठाकरेंचं जोरदार लॉन्चिंग सुरु आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे जनतेमध्ये जाऊन पोहोचतायत. खुद्द शिवसेना नेते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या दबावापुढे झुकत भाजपनं नमती भूमिका तर घेतली नाही ना? अशी चर्चा आता सुरु झालीय.

रविवारी मुंबईत झालेल्या भाजप कार्यकारणीच्या समारोपावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलच सुनावलं होतं. मी फक्त भाजपचाच नाही तर शिवसेना आणि आरपीआयचाही मुख्यमंत्री आहे. आणि पुन्हा परत येणार आहे असं स्पष्ट केलं. आपल्या मित्रपक्षात जास्त वाचाळवीर आहेत असा टोलाही त्यांनी लगावला होता.

भाजप महिला मोर्चाच्या नेत्या आणि भाजयुमोच्या पदाधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

युद्ध बदलले की शस्त्रे बदलावी लागतात, रणांगण बदललं की रणनीती बदलावी लागते, अशा शब्दात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. मुंबईत भाजपच्या कार्यकारणी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला प्रकर्षाने गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची आठवण येत असल्याचे सांगितले. आजचे पक्षाचे यश पाहायला हे दोघेही हवे होते असे फडणवीस म्हणाले. तसेच रावसाहेब दानवे यांनी केलेल्या कामाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. गेल्या 5 वर्षात पक्ष आणि सरकारमध्ये उत्तम समन्वय होता असे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 06:48 PM IST

ताज्या बातम्या