'प्रत्येकालाच वाटतं आपला मुख्यमंत्री व्हावा, त्यात काय चुकीचं?'

'मुख्यमंत्र्यांची आणि आदित्य ठाकरेंची यात्रा क्लॅश होणार नाही. आम्ही शिवसेनेलाही यात्रेत सहभागाचं आवाहन करणार.'

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 05:53 PM IST

'प्रत्येकालाच वाटतं आपला मुख्यमंत्री व्हावा, त्यात काय चुकीचं?'

मुंबई 24 जुलै : मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य करू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. मात्र त्यावरची वक्तव्य काही थांबायला तयार नाहीत. भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या वादावर पुन्हा एकदा मत व्यक्त केलंय. या प्रकरणी अमित शहांच्या पातळीवर निर्णय होईल. मुख्यमंत्री कोण होणार हे अजुन ठरलं नाही. मात्र प्रत्येक पक्षाला आपलाच मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं आणि त्यात चुकीचं काहीही नाही असं मत त्यांनी मुंबईत बोलताना व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची माहितीही त्यांनी दिली.

रविवारी मुंबईत झालेल्या भाजप कार्यकारणीच्या समारोपावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलच सुनावलं होतं. मी फक्त भाजपचाच नाही तर शिवसेना आणि आरपीआयचाही मुख्यमंत्री आहे. आणि पुन्हा परत येणार आहे असं स्पष्ट केलं. आपल्या मित्रपक्षात जास्त वाचाळवीर आहेत असा टोलाही त्यांनी लगावला होता.

पाहा VIDEO : राज्यसभेत हमसून हमसून रडू लागले खासदार

पुणे छेडछाड प्रकरण

पुण्यातल्या कार्यक्रमात एका महिलेची छेडछाड झाल्याच्या प्रकरणावरही त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, आम्ही सदर महिलांकडे चौकशी केली तर त्यांना कोणावर संशय आहे का असं विचारलं पण त्यांनी ते कोण होते हे माहिती नाही असं सांगितलं. ज्यांनी कोणी असं कृत्य केलं ते पक्षाचे कार्यकर्ते असतीलच असं नाही असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

Loading...

इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीत मोठी भरती, 'असा' करा अर्ज

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा यशस्वी करण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केलेत. या यात्रेच्या सुरुवातीला भाजपचे अध्यक्ष अमित शहा येण्याची शक्यता असून समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावं असा प्रयत्न असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. आमची आणि आदित्य ठाकरेंची यात्रा क्लॅश होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मॉब लिंचिंग आणि 'जय श्रीराम' याबदद्ल 49 सेलिब्रेटींचं मोदींना पत्र

अशी असेल यात्रा

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र इथे 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा, 14 जिल्ह्यात यात्रा, या दरम्यान 57 विधानसभा मतदार संघातून 1639 किमींचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार इथं होणार आहे.

पहिल्या दिवशी सगळं मंत्रिमंडळ उपस्थित राहणार असून नंतर प्रत्येक दिवसासाठी एका मंत्र्यांला प्रभारी करण्यात आलं आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये ही यात्रा जाईल असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 05:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...