S M L

सर्व्हेने उडाली भाजप नेत्यांची झोप, आठ खासदार आणि 40 आमदार पराभवाच्या छायेत?

भाजपनं महाराष्ट्रात एक अंतर्गत सर्व्हेक्षण केलंय. त्याचे निष्कर्ष धक्कदायक आल्याची माहिती आहे.

Updated On: Oct 11, 2018 08:45 PM IST

सर्व्हेने उडाली भाजप नेत्यांची झोप, आठ खासदार आणि 40 आमदार पराभवाच्या छायेत?

प्रफुल साळुंखे, मुंबई, ता. 11 ऑक्टोबर : भाजपनं महाराष्ट्रात एक अंतर्गत सर्व्हेक्षण केलंय. त्याचे निष्कर्ष धक्कदायक आल्याची माहिती 'न्यूज18 लोकमत'ला मिळाली आहे. या माहितीमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या  पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातल्या सर्व विधानसभा आणि लोकसभा मंतदार संघात हा सर्व्हे केला होता. त्यात लोकांना भाजपच्या आमदार आणि खासदारांंविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात लोकांनी भाजप आमदार आणि खासदारांविषयी नाराजी व्यक्त केली. भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत कमळ फुलणार नाही अशीच शक्यता व्यक्त होतेय.

2014 च्या लोकसभा निवडणुका आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत महाराष्ट्रात भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. नंतर गेल्या चार वर्षात अनेक बदल झालेत. त्यामुळं 2014 सारखी परिस्थिती राहणार नाही याची जाणीव भाजपला झाली. त्यामुळे भाजपने हा सर्व्हे करून घेतला. त्यात 8 खासदार आणि 40 आमदार हे पराभवाच्या छायेत आहेत असं स्पष्ट झालंय.

सर्व्हेचा पुरावा 'न्यूज18 लोकमत'च्या हातीभाजपने आपल्या सर्व्हेसाठी अशा प्रकारची प्रश्नावली तयार केली होती. त्यातून आमदार आणि खासदारांबद्दलची लोकांची मतं थेट जाणून घेण्यात आली.

भाजपने आपल्या सर्व्हेसाठी अशा प्रकारची प्रश्नावली तयार केली होती. त्यातून आमदार आणि खासदारांबद्दलची लोकांची मतं थेट जाणून घेण्यात आली.

अनेक ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ची आघाडी झाली तर ती भाजपसाठी आणखी त्रासदायक होऊ शकतं. तर शिवसेनेने अजुनही आपली पत्ते उघड केलेले नाहीत. भाजप युतीसाठी आग्रही आहे. ही युती झाली नाही तर त्याचा दोघांनाही फटका बसेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. मात्र शिवसेना अजुनही तयार नाही.

अशी होती प्रश्नावली

Loading...

  •  तुम्ही तुमच्या आमदारांवर खुश आहेत का?

  •  त्यांना परत निवडून देणारं का?

  •  त्यांना एक संधी द्यायची का?

  •  आमदार खासदार यांच्या कामावर खुश आहात का?

भाजपचे सोलापूरचे खासदार शरद बन्सोडे, धुळ्याचे खासदार सुभाष भामरे आणि रक्षा खडसे यांचं काम योग्य नसल्याचं लोकांनी सांगतल्याची माहिती असून त्यांच्या जागा धोक्यात आहेत असंही म्हटलं जातंय. मात्र ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या सर्व्हेत रक्षा खडसेंचं नाव नाही. त्यांची कामगिरी उत्तम असल्याचा अभिप्राय लोकांनी दिला असा खुलासा केलाय.

 

'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 07:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close