Elec-widget

हिंसेच्या तुरळक घटना वगळता महाराष्ट्र बंद शांततेत सुरू

हिंसेच्या तुरळक घटना वगळता महाराष्ट्र बंद शांततेत सुरू

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनावरून पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद हिंसेच्या तुरळक घटना वगळता शांततेत सुरू आहे.

  • Share this:

03 जानेवारी : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनावरून पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद हिंसेच्या तुरळक घटना वगळता शांततेत सुरू आहे. राज्यात काही ठिकाणी रेल रोकोचा प्रयत्न झाला तर दगडफेकीच्या तुरळक घटना घडल्या आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात या बंदमुळे जनजीवन फारसं विस्कळीत झालेलं नाही.

आंदोलनकर्त्यांकडून ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत. तर काही ठिकाणी संभाव्य हिंसाचाराची शक्यता पाहता दुकानदारांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. राज्यात आज सरकारी कार्यालयं आणि शाळांना सुट्टी नसली तरी बंदमुळे इथली उपस्थिती रोडावली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून शांततेचं आवाहन वारंवार केलं जात आहे.

तसंच, सोशल मीडियावरून अफवा पसरवल्या जाऊ नयेत यासाठी काही ठिकाणी पोलिसांकडून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2018 11:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...