'वंचित आघाडी'शी चर्चा करण्याची जबाबदारी काँग्रेसने दिली या नेत्यावर

'विधानसभा निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसचा अद्याप विचार नाही, पक्षात मतभेद आहेत.'

News18 Lokmat | Updated On: Jun 30, 2019 07:31 PM IST

'वंचित आघाडी'शी चर्चा करण्याची जबाबदारी काँग्रेसने दिली या नेत्यावर

नाशिक मुंबई 30 जून : लोकसभा निवडणुकीतून धडा घेऊन काँग्रेसने विधानसभेच्या तयारीला सुरुवात केलीय. वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभेच काँग्रेसला फटका बसला होता. तो धोका टाळण्यासाठी वंचितशी  आघाडीचा पर्याय काँग्रेसने खुला ठेवलाय. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर सोपवली आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलीय.

अशोक चव्हाण म्हणाले, येणारी निवडणूक महाराष्ट्र काँग्रेसच्या दृष्टीने महत्वाची आहे. काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केलीय. समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याआधी पक्षांच्या जिल्हा अध्यक्षांना विश्वासात घेऊन त्यांचे म्हणणे ऐकण्यात आले आहे अशी माहितीही त्यांनी दिली. लोकसभेच्या वेळी आम्हाला विचारातच घेण्यात आले नसल्याची  तक्रार काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केली होती.

नव्या चेहऱ्यांना संधी देणार

विधानसभा निवडणुकीत नवीन चव्हाऱ्याना संधी दिली जाणार आहे. तरुण महिलांनाही प्राधान्य असेल असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीशी आघाडी करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने तत्वतः निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. येत्या 8 दिवसात राष्ट्रवादीशी चर्चा करून जागा निश्चिती करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेस इतर समविचारी पक्षांचीही लवकरच बैठक घेणार आहे. 6 जुलै पर्यंत राज्यभरातून इच्छुकांचे अर्ज काँग्रेसने मागविले आहेत. त्यातून निवड करून मुलाखती घेतल्या जाणार आहे. स्थानिक प्रश्न कर्जमाफी, कर्ज वाटप  या विषयावर आंदोलनं केली जाणार आहेत. वंचित आघाडी ही भाजपची बी टीम होती ही राजकीय टीका होती अशी सारवासारवही त्यांनी केली.

Loading...

भाजपचं 'साम दाम दंड'

हवा येते तशी जाते. निवडणुकीनंतर कळेल कोणाची हवा आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. गिरीश महाजन यांनी काँग्रेसचे 50 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येणार नाही असे सांगणे म्हणजे त्यांनी EVM फिक्स केलेत असा अशी टीकाही अशोक चव्हाणांनी केली.

साम दाम दंड भेद याचा वापर भाजप कडून केला जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक हे विषय वेगळे आहेत. विधानसभेत आघाडीलाच यश मिळेल. मनसेला सोबत घेण्याबाबत अद्याप विचार नाहीत, मतभेद आहेत असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2019 07:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...