विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये.. गिरीश महाजनांनी वर्तवले भाकित

राज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील. सप्टेंबरमध्ये आदर्श आचारसंहिता लागू शकते, असे भाकित फडणवीस सरकारमधील संकटमोचन समजले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वर्तवले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 01:12 PM IST

विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये.. गिरीश महाजनांनी वर्तवले भाकित

प्रशांत बाग, (प्रतिनिधी)

नाशिक, 14 जुलै- राज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील. सप्टेंबरमध्ये आदर्श आचारसंहिता लागू शकते, असे भाकित फडणवीस सरकारमधील संकटमोचन समजले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वर्तवले आहे. नाशिक येथे रविवारी (14 जुलै) झालेल्या नियोजन बैठकीत गिरीश महाजन यांनी सर्वांचेच लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात हे भाकित वर्तवले आहे.  गेल्या निवडणुकीच्या तारखेनुसार विधानसभेच्या तारखेचा अंदाज व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीमुळे होऊ न शकलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. 10 किंवा 13 ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुका होतील. तसेच 10 किंवा 15 सप्टेंबरला आदर्श आचारसंहिता लागू शकते, असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यासाठी सुमारे 791.3 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यंदा सर्वसाधारण योजनांसाठी वाढीव 12 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती थेट संबंधित विभागाकडून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागल्याने आदिवासी उपयोजनांमध्ये यंदा हा निधी समाविष्ट केला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. अनुसूचित जाती उपाययोजनांत 97.55 कोटींची तरतूद कायम आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंजूर निधी खर्च करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर असणार आहे.

यापूर्वी चंद्रकांत पाटलांनी वर्तवले होते भाकित

Loading...

राज्यात येत्या सप्टेंबरपासून आचारसंहिता लागेल आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील, असे भाकित राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले होते. राज्यात येत्या 15 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल. तसेच 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होतील, असे चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी येथे झालेल्या एका कार्यक्रमात सांगितले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर शेरेबाजीही केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना पराभूत करणे, हे आपले टार्गेट असल्याचे पाटील यांनी म्हटले होते.

आत्महत्येचा असा VIDEO पाहिला नसेल, कॅमरे सुरू केला आणि...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...