सांगोला तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार, युवा नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

सांगोला तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार, युवा नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

पंढरपूर येथील भाजपा मेळाव्यात चेतनसिंह केदार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील.

  • Share this:

सोलापूर, 18 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत केदार भाजपच्या झेंडा हाती घेणार आहेत.

चेतनसिंह केदार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आहेत. पंढरपूर येथील भाजपा मेळाव्यात चेतनसिंह केदार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील. माजी उपनगराध्यक्ष म्हणुन काम पाहिलेले चेतनसिंह केदार भाजपवासी होत असल्याने सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठं नुकसान होणार आहे.

दरम्यान, आज सकाळीच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बरेच नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे भाकीत केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीला सांगोल्यात धक्का बसला आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांतदादा पाटील?

'काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार या आठवड्यात राजीनामा देतील आणि भाजपमध्ये प्रवेश करतील,' असा दावा महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यामुळे आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे.

'काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचा आत्मविश्वास खचला आहे. ते राजीनामा देवून हातपाय गाळत आहेत. त्यामुळे त्यांचे आमदारही आता राजीनामा देतील. निवडणुकीला सहा किंवा त्यापेक्षा जास्त महिने बाकी असताना राजीनामा दिला तर पोटनिवडणूक होते. पण आता तर निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे या आठवड्याभरात अनेक आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील,' असा दावा चंद्रकात पाटील यांनी केला आहे.

तरुणाची दादागिरी; पोलिसाने थेट कानशिलात लगावली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 03:21 PM IST

ताज्या बातम्या