मोहिते पाटलांनंतर सोलापूरमध्ये पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाड? 'हे' 4 नेते युतीच्या वाटेवर

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील चार नेते शिवसेना-भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

  • Share this:

लोकसभा निवडवणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश केला.

विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वत: भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरीही लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्याच उमेदवाराच्या बाजूने स्वत:ची ताकद उभी केली.

मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेतल्याने माढ्याची जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली.

आता आगामी विधानसभा निवडणुकीतही मोहिते पाटलांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील चार नेते शिवसेना-भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

रणजित शिंदे : माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र असून ते भाजपतून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.

सिध्दाराम म्हेत्रे : काँग्रेसचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आता भाजपच्या वाटेवर असल्यची चर्चा आहे.

भारत भालके : काँग्रेसचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र आगामी विधानसभेला भाजपच्या मार्फत शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. 2004 साली शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.

रमेश कदम : राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ विधानसभेचे आमदार आहेत. आगामी विधानसभेसाठी शिवसेनेतून लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 02:02 PM IST

ताज्या बातम्या