दिल तो बच्चा है जी! चर्चा, चहा आणि मैफिल; जत्रेत रोहित पवार रमले बालपणीच्या आठवणीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि बारामती जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याचं दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 10:03 AM IST

दिल तो बच्चा है जी! चर्चा, चहा आणि मैफिल; जत्रेत रोहित पवार रमले बालपणीच्या आठवणीत

कर्जत, 31 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि बारामती जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याचं दिसत आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित आपले नशीब आजमावणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदार संघात आपला संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी ते कोणत्या-न-कोणत्या निमित्तानं कर्जत-जामखेडच्या नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद अधिकाधिक कसा वाढेल, यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. नुकतंच त्यांनी श्री. सद्गुरू गोदड महाराज यांच्या यात्रेनिमित्त कर्जतला भेट दिली. जत्रेत गेल्यानंतर तेथे काय-काय केले, यासंदर्भातील एक पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. यात त्यांनी लहानपणीच्या साठवणीतील आठवणींना उजाळा दिला आहे. यात्रेत सहभागी झाल्यानंतर ते बालपणीच्या आठवणींमध्ये रमल्याचं दिसून आलं.

(पाहा :SPECIAL REPORT: भाजपचा करिश्मा, निवडणूक न लढताच पालिका ताब्यात)

रोहित पवार म्हणाले, दिल तो बच्चा है जी! 

कुठलीही यात्रा म्हटलं की तिथं खेळणी, रहाटपाळणे, फुलराणी, मौत का कुआ अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांची रेलचेल असते. विशेषतः लहान मुलांसाठी तर या खेळांचा आनंद काही वेगळाच असतो. कर्जतच्या श्री. सद्गुरू गोदड महाराज यांच्या यात्रेत जेव्हा फेरफटका मारत होतो, तेव्हा या खेळांचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या सर्वांची भेट झाली. खेळण्यांमध्ये बसण्यासाठी लहान मुले, तुमच्या माझ्यासारखे युवा व महिला वर्गाने प्रेक्षणीय गर्दी केली होती. हे सगळं चित्र पाहून मला माझे लहानपणीचे दिवस आठवले आणि काही क्षण आठवणींमध्येच हरवून गेलो. जरी वयाने मोठा झालो असलो आणि अनेक जबाबदाऱ्या वाढल्या असल्या तरी 'दिल तो बच्चा है जी' असे कोणाचे तरी बोल आठवले.

(पाहा :VIDEO: नवी मुंबईच्या राजकारणात बदल, गणेश नाईकांचा आज भाजप प्रवेश नाही)

Loading...

त्यामुळे मग मी ही या खेळण्यांमध्ये बसण्याचा मोह आवरू शकलो नाही. हे पाहून इथल्या मुलांनीही एकच गलका केला. थोड्या वेळासाठी मी ही त्यांच्यामध्ये रमून गेलो. यानंतर इथे आलेली मुलं व नागरिक यांच्या सोबत चर्चा केली. मनमोकळ्या गप्पा मारून आनंद वाटला. पुढे खेळ व्यवसाय चालवणाऱ्यांसोबत ही चर्चा केली, खेळण्याचा व्यवसाय करणारे सध्या असंघटित आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या अडचणी सरकारी दरबारात जोरकसपणे मांडता येत नाहीत. मी त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा समजलं की त्यांना यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यंदा दुष्काळ असल्यामुळे व्यवसायाला प्रतिसादही कमी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यात्रेतून पुढं जात असताना काही युवकांनी आवाज दिला. जवळच चहाचे दुकान ही होते, मग काय? चहा घेता घेता या मित्रांसोबत गप्पांची जणू मैफिलच रंगली होती. एकंदरच काय तर श्री. सद्गुरू गोदड महाराज यांची यात्रा मला पूर्णपणे माझ्या लहानपणीत घेऊन गेली.

(PHOTO : रोहित पवारांची मोर्चेबांधणी.. Facebook वर 'असे' फोटो टाकून जोरदार प्रचार)

वाचा : मिशन विधानसभा : कर्जत-जामखेडच का? रोहित पवारांनी केला खुलासा

दरम्यान, रोहित पवार यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. राष्ट्रवादीच्या तिकीटावर कर्जत जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी पक्षाकडे अर्ज केला आहे. निवडणुकीसाठी याच मतदारसंघाची निवड का केली, याबाबत खुलासाही त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. रोहित पवारांनी कर्जत-जामखेडमधून विधानसभेसाठी दंड थोपटल्याने त्यांची लढत या मतदारसंघातील विद्यमान भाजप आमदार राम शिंदे यांच्याविरोधात होणार आहे. अहमदनगरचे पालकमंत्री असलेल्या राम शिंदे यांच्याविरोधातील ही लढत रोहित पवारांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. असं असतानाही रोहित पवारांनी फेसबुक पोस्ट लिहित या मतदारसंघाची निवड करण्यामागचं कारण सांगितलं आहे.

"कर्जत जामखेड का?'' वाचा रोहित पवारांची फेसबुक पोस्ट

SPECIAL REPORT : आमचे हे दिसत नाही, भाजपात गेले की काय? सोशल मीडियावर हास्यकल्लोळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 09:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...