News18 Lokmat

महाराष्ट्रात नवं समीकरण, प्रकाश आंबेडकरांची साथ सोडलेल्या नेत्यांना राजू शेट्टी सोबत घेणार?

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जर तिसरी आघाडी स्थापण झाली तर काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकते.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 01:40 PM IST

महाराष्ट्रात नवं समीकरण, प्रकाश आंबेडकरांची साथ सोडलेल्या नेत्यांना राजू शेट्टी सोबत घेणार?

मुंबई, 24 जुलै : महाराष्ट्रातील डाव्या आघाडीकडून आजा पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने, जनता पार्टीचे नेते न्या. बी. जी. कोळसे पाटील, कॉ. अशोक ढवळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी संभाजी ब्रिगेडचे नेते श्री. खेडेकर हे उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने महाराष्ट्रात मोठं यश मिळवलं. त्यामुळे विधानसभेत या युतीचा मुकाबला करण्यासाठी विविध राजकीय पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. पण काँग्रेसच्या नेतृत्वात या पक्षांची आघाडी अद्याप झालेली नाही. त्यातच आज होत असलेल्या डाव्या आघाडीच्या नेत्यांच्या या पत्रकार परिषदेत नेमकी काय भूमिका घेतली जाते, हे पाहवं लागेल.

लोकसभेला वंचित आघाडी वेगळी लढल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकीवर काँग्रेसचा भर असणार आहे. अशातच राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जर तिसरी आघाडी स्थापन झाली तर काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकते.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीयपक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, या प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आव्हान असणार आहे. कारण, विधानसभा निवडणुकीत मराठा क्रांती ठोक मोर्चा आपले उमेदवार उभे करणार आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होणार आहे.

VIDEO: ओव्हरटेक करण्याच्या नादात कलंडली बस, तुम्हीच पाहा पुढे काय झालं

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 01:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...