पार्थ पवारांचं कमबॅक, विधानसभेसाठी अजित पवारांसोबत उचलली 'ही' जबाबदारी

पिंपरी चिंचवडमधील मुलाखती घेताना राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार हेदेखील उपस्थित असणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 01:02 PM IST

पार्थ पवारांचं कमबॅक, विधानसभेसाठी अजित पवारांसोबत उचलली 'ही' जबाबदारी

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 26 जुलै : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार घेत आहेत. या महत्वपूर्ण प्रक्रियेत पिंपरी चिंचवडमधील मुलाखती घेताना राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार हेदेखील उपस्थित असणार आहेत.

मावळ लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. त्यामुळे ते खचले की काय असं वाटत असताना पार्थ ह्यांनी कमबॅक केलं आहे. पार्थ यांनी आता थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रांगेत स्थान मिळवत आगामी विधानसभा निवडणुकीत सक्रियपणे काम करण्याचं ठरवलेलं दिसत आहे.

दरम्यान, येत्या रविवारी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, अजित पवार, राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण आणि पार्थ पवार यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला पिंपरी-चिंचवड आणि भोसरी मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

या तीन विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी आतापर्यंत 21 जणांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष पिंपरी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली आहे. एकूणच विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असल्याचं पाहायला मिळत आहे.

SPECIAL REPORT : शेतकऱ्यांची 100 कोटींची फसवणूक, वर्षभर मेहनत केली आणि व्यापारांनी लुटलं

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 11:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...