राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांना दणका देण्यासाठी पवारांचा प्लॅन तयार, 'ही' आहे नवी रणनीती

पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांना चितपट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने नवी रणनीती आखल्याचं दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2019 09:36 AM IST

राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांना दणका देण्यासाठी पवारांचा प्लॅन तयार, 'ही' आहे नवी रणनीती

मुंबई, 28 जुलै : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पक्षातून बाहेर पडत आहेत. या आऊटगोईंमुळे राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. अशातच आता पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांना चितपट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने नवी रणनीती आखल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय डावपेचांची अनेकदा चर्चा होते. पण आता पवारांना पुन्हा शह देण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि काही नेते गळाला लावले आहेत. त्यामुळे पक्ष सोडलेल्या नेत्यांना दणका देण्यासाठी पवारांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

विधानसभेसाठी पवारांचा 'पॉवर'प्लॅन

नेत्यांच्या आऊटगोईंगची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीही भाजपचाच शैली अवलंबणार आहे. राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचाच असंतुष्ट नेता गळाला लागतो का, याची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे. तसंच मतदारसंघात तरूण नेत्यांना बळ देऊन पक्षांतर केलेल्या नेत्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी विशेष मेहनत घेणार असल्याची माहिती आहे.

पक्ष सोडलेल्या नेत्यांवर रोहित पवारांचा हल्लाबोल

Loading...

राष्ट्रवादी सोडणाऱ्या या नेत्यांवर पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षात बदल करताना नेहमी भाकरी फिरवणे या शब्दाचा वापर करत असतात. आता शरद पवार यांचे नातू रोहित यांनीही पवारांच्याच शैलीत नेत्यांवर निशाणा साधला आहे. 'एखाद्या व्यक्तीच्या सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं,' अशा शब्दांत रोहित पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना टोला लगावला आहे.

VIDEO : मृत्यूच्या वेढ्यातून सुटका झाल्यानंतर प्रवाशांना अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 09:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...