अहमदनगर, 25 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला लागला असल्याची माहिती आहे. कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
वैभव पिचड अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नुकताच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठीच ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे.
मधुकर पिचड राष्ट्रवादीच्या संस्थापक नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असेच आऊटगोईंग सुरू राहिल्यास राष्ट्रवादीला निवडणुकीत विजय खेचून आणण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
मुंबईतही राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता, सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही. मात्र सचिन अहिर शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यासाठी एका पायावर तयार असल्याचंही सांगण्यात येत आहे. अहिर यांना शिवसेनेत घेतल्यावर त्यांना कोणता मतदारसंघ सोडायचा यावर एकमत होत नसल्यामुळे तुर्तास सचिन अहिर यांना थांबण्यास सांगण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र आज गुरुवारी (25 जुलै) दिवसभरात काहीही घडू शकतं अशीही शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात 'न्यूज 18 लोकमत'नं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन बंद होता.
SPECIAL REPORT: दुष्काळावर मात करून लाखोंचं उत्पन्न घेणाऱ्या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा