अजित पवार मुलाखत घेण्यासाठी सोलापुरात, राष्ट्रवादीचे 2 आमदार मात्र गायब

अजित पवार यांच्या मुलाखतींना राष्ट्रवादीचे दोन विद्यमान आमदार अनुपस्थित राहिले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 02:39 PM IST

अजित पवार मुलाखत घेण्यासाठी सोलापुरात, राष्ट्रवादीचे 2 आमदार मात्र गायब

सागर सुरवसे, सोलापूर, 26 जुलै : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सोलापूरमध्ये आहेत. मात्र या मुलाखतींना पक्षाचे दोन विद्यमान आमदार अनुपस्थित राहिले आहेत.

माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी अजित पवारांकडे विधानसभेसाठीच्या मुलाखतीसाठी जाणं टाळलं आहे. तसंच मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे जेलमध्ये आहेत, तर माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस यांचे काही दिवसापूर्वी निधन झालं आहे.

आमदार बबनदादा शिंदे आणि दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला जाणं टाळल्याने त्यांच्या पक्षबदलाबाबतच्या चर्चांना आणखीनच बळ मिळालं आहे. आमदार शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपतून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. तर दिलीप सोपलही पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन आमदार राष्ट्रवादीच्या मुलाखतीसाठी गेले नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेनं वेग पकडला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडवणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश केला. विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वत: भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरीही लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्याच उमेदवाराच्या बाजूने स्वत:ची ताकद उभी केली.

मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेतल्याने माढ्याची जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली. आता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील चार नेते शिवसेना-भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यामध्ये काँग्रेसचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारत भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ विधानसभेचे आमदार रमेश कदम आणि काँग्रेसचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांचाही समावेश आहे.

Loading...

VIDEO: भररस्त्यातून तरुणाचं अपहरण आणि नंतर हत्या, पिंपरीतील थरार CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 02:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...