काँग्रेसला धक्का, माजी राष्ट्रपतींचे चिरंजीव वंचित आघाडीकडून लढणार?

काँग्रेसला धक्का, माजी राष्ट्रपतींचे चिरंजीव वंचित आघाडीकडून लढणार?

विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत असतानाच काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत असतानाच काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत हे वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी नुकतीच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. मुंबईत ही भेट झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. रावसाहेब शेखावत वंचित आघाडीच्या तिकीटावर अमरावतीमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच ही भेट झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अमरावतीतून सध्या भाजपचे सुनील देशमुख आमदार आहेत. त्यांच्याविरोधात रावसाहेब शेखावत हे वंचित आघाडीच्या तिकीटवार निवडणूक लढवू शकतात. 'न्यूज 18 लोकमत'ने याबाबत शेखावत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण शेखावत यांचा संपर्क होऊ शकला नाही.

शेखावत आणि यशोमती ठाकूर यांच्यातील मतभेद

अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि रावसाहेब शेखावत यांच्यातील मतभेद याआधी समोर आलेले आहेत. रावसाहेब शेखावत आणि भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्यामधील कथित संभाषण काही महिन्यांपूर्वी 'न्यूज 18 लोकमत'च्या हाती लागले होते. यात काँग्रेस आमदार यशोमती यांना पराभूत करण्यासाठी पक्षातूनच लॉबिंग होत आहे, हे या संभाषणातून समोर आल्याचं बोललं जात होतं.

काँग्रेसमधील नेते आपल्याच पक्षातील उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजप नेत्यांसोबत चर्चा करत आहेत. या फोन रेकार्डिंगमुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली होती. निवडणुकीत येणाऱ्या पाच कोटी रूपयांच्या खर्चावरही फोनवर चर्चा झाली. यशोमती ह्या गेल्या 2 विधानसभा निवडणुकीपासून तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार आहेत. निवडणूक खर्चासाठी पाच कोटींची तयारी असल्याची चर्चाही फोन संभाषणादरम्यान झाली आहे. मात्र रावसाहेब शेखावत यांनी या रेकॉर्डिंग मधला आवाज आपला नाही असा दावा केला होता.

जगभरातून लोकं येतात अजिंठा लेणी पाहायला, तिथे गर्दुल्ले फुकताय हुक्का!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 09:38 AM IST

ताज्या बातम्या