हायप्रोफाईल अधिकारी राजकारणाच्या मैदानात? 'या' मतदारसंघात भाजपकडून लढण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या राजकीय क्षेत्रातील एण्ट्रीमध्ये वाढ झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 12:21 PM IST

हायप्रोफाईल अधिकारी राजकारणाच्या मैदानात? 'या' मतदारसंघात भाजपकडून लढण्याची शक्यता

पुणे, मुंबई, 1 ऑगस्ट :  हायप्रोफाईल पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या भानूप्रताप बर्गे हे नुकतीच पोलीस सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी बर्गे हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या राजकीय क्षेत्रातील एण्ट्रीमध्ये वाढ झाली आहे. अशातच  एसीपी म्हणून काम पाहिलेल्या बर्गे यांच्या राजकीय क्षेत्रातील पदार्पणाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. बर्गेंच्या निवृत्तीपूर्वी पुणे शहरात  शुभेच्छांचे पोस्टर्स लागले होते. त्यानंतर या चर्चांनी अधिकच वेग पकडल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, हायप्रोफाईल अधिकारी आणि राजकारण हा ट्रेण्ड गेल्या काही दिवसांपासून सुरू झाला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांचा शिवसेना प्रवेश आणि विधानसभा मतदारसंघ याबाबतही अनेक अंदाज बांधण्यात येत आहेत. तसंच निवृत्त IPS अधिकारी साहेबराव पाटील यांच्याही राजकारणातील प्रवेशाबद्दल कयास लावण्यात येत आहेत.

प्रदीप शर्मा आणि शिवेसना

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पोलीस सेवेतून निवृत्त झाले आहेत. पोलीस सेवेतून बाहेर पडल्यानंतर आता ते राजकारणात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.  प्रदीप शर्मा हे शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. अंधेरी मतदारसंघातून ते संभाव्य उमेदवार असू शकतात.

Loading...

VIDEO: नवनीत राणांचा नवा अवतार, पेरणीनंतर आता फवारणी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 12:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...