काँग्रेसला अच्छे दिन आणण्यासाठी बाळासाहेब थोरात मैदानात, अशी आहे रणनीती

काँग्रेसला अच्छे दिन आणण्यासाठी बाळासाहेब थोरात मैदानात, अशी आहे रणनीती

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लवकरच काँग्रेस पक्षाच्या विभागनिहाय बैठका होणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 जुलै : लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत समाधानकारक जागा मिळाव्यात यासाठी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी  लवकरच काँग्रेस पक्षाच्या विभागनिहाय बैठका होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्तीत जास्त जागांवर विजयी करण्याचा बाळासाहेब थोरात यांचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठीच प्रत्येक विभागातील  काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत बाळासाहेब थोरात नव्याने रणनीती आखणार आहेत.

विधानसभा तयारीचा घेणार आढावा, कोणत्या विभागात कधी होणार बैठक?

नवी मुंबई, कोकण विभाग - गुरुवार

नाशिक विभाग - शुक्रवार

पुणे विभाग - शनिवार

या आढावा बैठकींना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, विभागातील कार्याध्यक्ष उपस्थित असणार आहेत. इच्छुक उमेदवार आणि काँग्रेसची मतदारसंघातील स्थिती, यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने महाराष्ट्रात मोठं यश मिळवलं. त्यामुळे विधानसभेत या युतीचा मुकाबला करण्यासाठी विविध राजकीय पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. पण काँग्रेसच्या नेतृत्वात या पक्षांची आघाडी अद्याप झालेली नाही. त्यातच आज होत असलेल्या डाव्या आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी हे नेते काय भूमिका घेतात, हे पाहावं लागेल.

लोकसभेला वंचित आघाडी वेगळी लढल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकीवर काँग्रेसचा भर असणार आहे. अशातच राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जर तिसरी आघाडी स्थापन झाली तर काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकते.

VIDEO: जिवाशी खेळ! नागपंचमीला येथे अंगाखांद्यावर खेळतात विषारी साप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 02:51 PM IST

ताज्या बातम्या