EXCLUSIVE : मुंबईतूनही निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर CM फडणवीसांनी पहिल्यांदाच दिलं उत्तर

मुख्यमंत्री फडणवीसांनी 'न्यूज 18 लोकमत'सोबत बोलताना पहिल्यांदाच खुलासा केला आहे.

सागर कुलकर्णी सागर कुलकर्णी | News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 05:51 PM IST

EXCLUSIVE : मुंबईतूनही निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर CM फडणवीसांनी पहिल्यांदाच दिलं उत्तर

मुंबई, 19 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन मतदारसंघातून उभे राहतील, अशी जोरदार चर्चा रंगत आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी 'न्यूज 18 लोकमत'सोबत बोलताना पहिल्यांदाच खुलासा केला आहे.

'मुंबईमधील मतदारसंघातून नाही तर मी फक्त नागपूरमधूनच निवडणूक लढवणार आहे,' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मुख्यमंत्री मुंबईतून निवडणूक लढवणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण आता स्वत: मुख्यमंत्र्यांनीच याबाबत खुलासा करत इतर शक्यता फेटाळून लावल्या आहेत.

काय होती चर्चा?

आगामी विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी भाजपनं चांगलीच कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातून रोज नवनवीन माहिती ऐकायला मिळत आहे. यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन ठिकाणांहून आगामी विधानसभा निवडणूक लढवतील, असं बोललं जात होतं. नागपूर आणि मुंबई अशा दोन ठिकाणाहून मुख्यमंत्री आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा दावा करण्यात आला होता.

कोणत्या मतदारसंघाची होती चर्चा?

Loading...

मुंबईतील मलबार हिल विधानसभा हा सुरक्षित पर्याय मुख्यमंत्र्यांसमोर आहे, अशी चर्चा होती. हा पर्याय मान्य झाल्यास देवेंद्र फडणवीस नागपूर आणि मुंबई दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवणार यावर शिक्कामोर्तब येईल, असंही बोललं गेलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केल्यास काय होईल? असं मत एका एजन्सीमार्फत जाणून घेण्यात आलं. मलबार हिल भाजपचा बालेकिल्ला असल्याने हा मतदारसंघ मुख्यमंत्री यांच्यासाठी योग्य मानला जात आहे. मलबार हिल हा आमदार मंगल प्रभात लोढा यांचा मतदार संघ असून त्यांच्यावर मुंबई प्रदेश भाजप अध्यक्षपदाची जबादारी सोपवण्यात आली आहे. पुढे अन्य जबाबदारी देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री इथून लढतील, अशी चर्चा रंगत होती.

VIDEO : संसदेत विषय शेतकरी कर्जमाफीचा पण प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंना हसू आवरेना!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2019 05:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...