मुख्यमंत्री फडणवीस 40 आमदारांचं तिकीट कापणार, नेत्यांची धाकधूक वाढली

मुख्यमंत्री फडणवीस 40 आमदारांचं तिकीट कापणार, नेत्यांची धाकधूक वाढली

आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 40 ते 50 विद्यमान भाजप आमदारांचं तिकीट कापू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : विधानसभेसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या मतदारसंघाची बांधणी करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. अशातच आता भाजप आमदारांसाठी मात्र धोक्याची घंटा वाजली आहे. कारण आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 40 ते 50 विद्यमान भाजप आमदारांचं तिकीट कापू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. पण आता मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होणार आहे. त्यामुळे मग भाजपही शिवसेनेसोबत जळवून घेताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस अकार्यक्षम आमदारांना घरचा रस्ता दाखवू शकतात, अशी माहिती आहे. या शक्यतेमुळे भाजपच्या नेत्यांची धाकधूक मात्र चांगलीच वाढली आहे.

दरम्यान, लोकसभेतील मोठ्या पराभवानंतर कमबॅक करण्यासाठी काँग्रेसनं राज्यातील नेतृत्वात बदल केला. त्यानंतर आता भाजपही आपल्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसारच आता अनेक नेत्यांची नावं प्रदेशाध्यपदासाठी समोर येत आहेत. यामध्ये सध्या इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी आघाडी घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आमदार हाळवणकर यांच्या गळात भाजपच्या प्रदेशाध्यपदाची माळ पडणार का, हे पाहावं लागेल.

दरम्यान, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेल्या रावसाहेब दानवे यांचा केंद्रातील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. या पदासाठी भाजपमधून अनेक नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत.

दानवे दिल्लीत जाणार असल्याने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी याआधी शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपचे सरचिटणीस संजय कुटे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. यामध्ये आता आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नावाचीही भर पडली आहे.

VIDEO: फडणवीस सरकारमधल्या मंत्र्यांनंच केलं निवडणुकींच्या तारखांचं भाकीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 04:18 PM IST

ताज्या बातम्या