News18 Lokmat

पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मास्टरप्लॅन, महाराष्ट्र पिंजून काढणार

राज्यातील सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने व्यूवरचना आखली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2019 11:04 AM IST

पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मास्टरप्लॅन, महाराष्ट्र पिंजून काढणार

विवेक कुलकर्णी, मुंबई, 21 जुलै : विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी महिनाभर महाजनादेश यात्रा काढणार आहेत.

विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच राज्यातील सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने व्यूवरचना आखली आहे. त्याअंतर्गत मुख्यमंत्री फडणवीसांनी महाजनादेश यात्रेचं आयोजन केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील महाजनादेश यात्रा काढणार आहेत.

दरम्यान, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा करण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे हे जन-आशीर्वाद यात्रेद्वारे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.

आघाडीही कमबॅकसाठी सज्ज

मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता गमवावी लागली. पण आता पुन्हा एकदा विजय खेचून आणण्यासाठी आघाडीचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

Loading...

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नुकतीच मुंबईत बैठक झाली. जागावाटपाबाबत या बैठकीत फॉर्म्युला ठरणार होता मात्र त्याबाबत अजून निर्णय झाला नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. घटक पक्षांनी जागांची मागणी केल्याने त्यांच्याशीही चर्चा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मनसेबाबत या बैठकीत चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे यांनी आपल्या दिल्ली भेटीत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे मनसेचा आघाडीत घेण्याबाबत काँग्रेस सकारात्मक असल्याचं बोललं जातं आहे.

...म्हणून जनतेचा आशीर्वाद हवाय, आदित्य ठाकरेंची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 10:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...