'काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार या आठवड्यात राजीनामे देतील'

चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यामुळे आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 01:13 PM IST

'काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार या आठवड्यात राजीनामे देतील'

सागर सुरवसे, सोलापूर, 18 जुलै : 'काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार या आठवड्यात राजीनामा देतील आणि भाजपमध्ये प्रवेश करतील,' असा दावा महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यामुळे आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे.

'काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचा आत्मविश्वास खचला आहे. ते राजीनामा देवून हातपाय गाळत आहेत. त्यामुळे त्यांचे आमदारही आता राजीनामा देतील. निवडणुकीला सहा किंवा त्यापेक्षा जास्त महिने बाकी असताना राजीनामा दिला तर पोटनिवडणूक होते. पण आता तर निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे या आठवड्याभरात अनेक आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील,' असा दावा चंद्रकात पाटील यांनी केला आहे.

विश्वजीत कदमांनी केला पलटवार

'काँग्रेसच्या पाचपैकी एका कार्याध्यक्षाने भाजपमध्ये प्रवेश केला तर आश्चर्य वाटायला नको,' असं म्हणत याआधीच भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खळबळ उडवून दिली होती. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यावर पलटवार करत काँग्रेस कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांनी जोरदार टीका केली.

'चंद्रकांतदादांचं वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही. आताच त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यपदी निवड झाली आहे. ते राज्याचे ज्येष्ठ मंत्रीदेखील आहेत. असं असताना त्यांनी केलेलं हे वक्तव्य केवळ हस्यास्पद आहे,' अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

Loading...

चाकण हिंसाचार प्रकरणाला नवं वळण, मराठा कार्यकर्त्यांचं अटकसत्र सुरू?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 10:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...