LIVE : तब्बल 17 तासांनंतर Mahalaxmi Expressमधील सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका

LIVE : तब्बल 17 तासांनंतर Mahalaxmi Expressमधील सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका

शनिवारी (27 जुलै) आणि रविवारी (28 जुलै) देखील मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : मुंबई, ठाणे, डोंबिवली-कल्याण परिसरात शुक्रवारपासून (26 जुलै) मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, शनिवारी (27 जुलै) आणि रविवारी (28 जुलै) देखील मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये आणि समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेवरील बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसला चहुबाजूंनी पावसाच्या पाण्यानं वेढा घातला आहे. जवळपास 2000 प्रवासी एक्स्प्रेसमध्ये अडकले होती. तब्बल 17 तासांच्या थरारानंतर NDRFच्या पथकानं सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका केली.

LIVE UPDATE :

एनडीआरएफकडून सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका

- पावसामुळे मदतकार्यात अडथळा, सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, त्यांच्या जेवणाची आणि वैद्यकीय तपासणीची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.

बदलापूरला नेऊन त्यांना मनमाडमार्गे कोल्हापूरला पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

- NDRFच्या पथकानं 500हून अधिक प्रवाशांचा जीव वाचवला

- NDRFनं 220 प्रवाशांचा जीव सुखरुप वाचवला

- NDRFनं 117 महिला आणि मुलांना सुखरुपरित्या वाचवलं

- NDRFचं पथक घटनास्थळी दाखल

- NDRFच्या पथकाकडून बचावकार्यास सुरुवात

- बदलापूर-वांगणीदरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील दोन हजार प्रवासी अडकले आहेत. वांगणीदरम्यान रेल्वे रुळावर प्रचंड प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी NDRF ला पाचारण .

- मुंबईतून 50 जणांची टीम एकूण 6 बोटीच्या सहाय्याने बचावकार्य करणार

- पुण्यातून 40 जणांची टीम आणखी 5 बोटींसह बचावकार्य करण्यासाठी बदलापूरच्या दिशेने रवाना

- अडकलेल्या प्रवासी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीसाठी नौसेना आणि एनडीआरएफ टीम प्रमुख यांना राज्य सरकारने मदतीसाठी संपर्क केला. हेलिकाॅफ्टर तसंच इतर सुविधा द्यावी, अशी मागणी केली आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

येत्या 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसंच कोकणातही जोरदार पावसाचा अंदाज आहे.

मध्य रेल्वे: बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली

हवाई वाहतुकीला फटका

मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्याचा फटका छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या हवाई वाहतुकीलाही बसला आहे. यामुळे काही विमाने रद्द, काही विमानांच्या वेळापत्रकांमध्ये बदल तर काही विमानांच्या उड्डाणात उशीर झाला आहे.  वेगवान वारे, कमी दृश्यमानता आणि पाऊस यामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

'शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यावा'

पावसाची परिस्थिती पाहून शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापकांनी सुट्टी देण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी दिली आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.

(पाहा : VIDEO : पाण्याशी पंगा पडला महागात, लाखो रुपयांची मर्सिडिज पाण्यात बुडाली)

कर्जत/खोपोली ते बदलापूर लोकल सेवा बंद

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात पावसानं अक्षरशः थैमान घातलं आहे. बदलापूर आणि अंबरनाथ स्टेशन येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं खबरदारी म्हणून लोकल वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान,मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे.

अंधेरी सब-वे पाण्याखाली

मुंबई पश्चिम उपनगरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी पूर्व ते पश्चिमेला जाणारा हा मार्ग वाहनांसाठी, नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. परिसरात दोन ते तीन फूट पाणी साचलं आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

(वाचा : मुंबईकरांनो, पुढचे चार दिवस काळजी घ्या; हवामान विभागाने दिला मोठा इशारा)

- मुलुंड, दादर, वरळी, बोरिवली, घाटकोपर, वांद्रे, अंधेरी परिसरात पाऊस

- ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

- कल्याण ते कर्जतदरम्यान लोकल सेवा बंद

- भिवंडी : तिनबत्ती बाजारपेठमध्ये बऱ्याच दुकानांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. भाजीपाला व्यावसायिकांचे हाल.

- भिवंडी : वाडा रोडवर पाणी जैसे थे, चिंबिपाडा इथं वारणा नदीत वाहून गेलेल्या कैलास भगत याचा शोध सकाळी 9 नंतर सुरू करणार.

- रायगड : जिल्ह्यात पावसाची संततधार. महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड तालुक्यात जोरदार पाऊस.

अंबा, सावित्री, कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ. सावित्री नदीने धोक्याची पातळी गाठली.

- उल्हासनगर : उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली, नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला. काराव, पाषाण, खाड्याचा पाडा, आरडे गाव तसंच एक्सरबिया या परिसराचा संपर्क तुटला.

- मुंबई-गोवा महामार्ग गेल्या 12 तासांपासून ठप्प

- वांगणीमध्ये पाषाण पुलावर पाणी

- नागपूरमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस

ठाण्यात साचलेल्या पाण्यात चालणेही जीवावर बेतू शकते, मुलगा थोडक्यात बचावला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 12:26 PM IST

ताज्या बातम्या