News18 Lokmat

महादेव जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा

महादेव जानकर यांचा भाजपच्या तिकीटावर असलेल्या विधानपरिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. मात्र जानकरांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीच्या तिकिटावर अजूनही संभ्रम कायम आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2018 02:06 PM IST

महादेव जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा

नागपूर, 06 जुलै : महादेव जानकर यांचा भाजपच्या तिकीटावर असलेल्या विधानपरिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. मात्र जानकरांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीच्या तिकिटावर अजूनही संभ्रम कायम आहे. भाजप तिकिटावर विधानपरिषदेवर जायला जानकरांनी स्पष्ट नकार दिलाय. भाजपचा राजीनामा न देता अर्ज भरल्यास रासपचा अर्ज बाद होऊ नये म्हणून त्यांनी हा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा

उन्नावमध्ये एका महिलेला जंगलात नेऊन बलात्काराचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

'तू माझी आयडॉल आहेस मनिषा...' सोनालीने व्यक्त केली भावना

संत्रापुरी कशी बनली तुंबापुरी, हे पहा फोटो

Loading...

आता रासपच्या चिन्हावर निवडणूक अर्ज भरला आहे. मात्र भाजपाच्या कोट्यातून रासपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मंंजुरी आवश्यक आहे.

विधान परिषदेसाठी भाजपचे पाच सदस्य निवडून येतात. यासाठी भाजपच्या पाच अधिकृत उमेदवारांची यादी आली. यात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना भाजपचे उमेदवार दाखवले होते. भाजपच्या चार जणांनी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले; परंतु महादेव जानकर यांनी भाजपकडून अर्ज दाखल करण्यास नकार दिला व राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2018 02:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...