दुग्धविकास मंत्र्यांना दूध उत्पादकांनीच सुनावलं;जानकरांनी घेतला काढता पाय

दुग्धविकास मंत्र्यांना दूध उत्पादकांनीच सुनावलं;जानकरांनी घेतला काढता पाय

या मेळाव्यात दूधाला 27 रुपयांचा दर मिळवून दिल्याचं सांगत जानकरांनी दूध उत्पादकांसमोर स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. खोटं बोल पण रेटून बोल या म्हणी प्रमाणे मंत्री महोदयांनी जाहीर भाषणात शासनाने दुधाला 27 रुपये लिटरला हमीभाव देत असल्याचे स्पष्ट तर केलेच पण मंत्री महोदय एवढ्यावरच थांबले नाहीत तर व्यासपीठावर बसलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक हे दुधाला 27 रुपये दर देतात असे ठासून सांगत त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले

  • Share this:

29 मार्च:   सरकारच्या पारदर्शक कारभाराचे गोडवे गाणाऱ्या दुग्धविकास  मंत्री महादेव जानकर यांना  एका दूध उत्पादकानं चांगलंच सुनावलंय. पंढरपुरातल्या पशुपालक मेळाव्याला पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर उपस्थित होते.

या मेळाव्यात  दूधाला 27 रुपयांचा दर मिळवून दिल्याचं सांगत जानकरांनी दूध उत्पादकांसमोर स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. खोटं बोल पण रेटून बोल या म्हणी प्रमाणे मंत्री महोदयांनी जाहीर भाषणात शासनाने दुधाला 27 रुपये लिटरला हमीभाव देत असल्याचे स्पष्ट तर  केलेच  पण  मंत्री महोदय एवढ्यावरच थांबले नाहीत तर व्यासपीठावर बसलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक हे दुधाला 27 रुपये दर देतात असे ठासून सांगत त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. मात्र तितक्यात एक दूध उत्पादक व्यासपीठाजवळ आला आणि कोणतीही संस्था दुधाला 27 रुपयांचा दर देत नाही.  कोणत्याही संस्थेकडून दुधाला 22 रुपयांपेक्षा अधिक दर दिला जात नाही.. त्यामुळे उगाच स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नका, असं या शेतकऱ्यानं जानकरांनाच सुनावलं. दूध दरच्या बिलाचा कागद फडकवित शेतकऱ्यांनी मंत्रीमहोदयांच्या दर वाढीच्या निर्णयाची चिरफाड केली. या मेळाव्याला दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ व राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरी म्हैस वंशावळ सुधारणा प्रकल्पांतर्गत आयोजित केलेल्या पशुपालक मेळाव्यात हा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता.

जिल्हा दूध संघाच्या दूध बिलाचे पुरावे घेऊन दूध उत्पादक शेतकरी प्रश्नाचा भडीमार करू लागल्याने जानकरांनी माहिती घेतो, पाहतो, बघतो अशी बुळबुळीत उत्तर देत पोलीस बंदोबस्तात काढता पाय घेतला...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 29, 2018 07:05 PM IST

ताज्या बातम्या