जानकरांचे शरद पवारांना 'ओपन चॅलेंज', 'महाराष्ट्र केसरीपेक्षा हिंद केसरी व्हायला आवडेल'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 14, 2019 02:10 PM IST

जानकरांचे शरद पवारांना 'ओपन चॅलेंज', 'महाराष्ट्र केसरीपेक्षा हिंद केसरी व्हायला आवडेल'

मुंबई, 14 फेब्रुवारी : 'भाजपानं जागा सोडल्यास शरद पवारांविरोधात निवडणूक लढवायला तयार आहे. महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी होणं जास्त आवडेल,' असं म्हणत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी थेट पवारांना आव्हान दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यानंतर आता जानकर यांनी लगेचंच पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. 'मी बारामती आणि माढा येथे निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दिला आहे,' असंही महादेव जानकर म्हणाले.

'मुख्यमंत्री बारामतीची जागा सोडतील'

'बारामतीत कमळ फुलणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत असले तरीही आम्ही पाच मिनिटांच्या मुलाखतीत मतदार संघ आम्हाला मिळवू. सीएम आमचं म्हणणं ऐकतील याची मला खात्री आहे,' असा विश्वासही महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.

बारामती आणि शरद पवार

Loading...

बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला. पण पवारांच्या याच बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणशिंग फुंकले आहे. येणाऱ्या निवडणुकीत बारामतीतून कमळ फुलणार, असा दावाच मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

शरद पवारांनी राजकारणात एंट्री केल्यानंतर विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्यांचा एकदाही पराभव झालेला नाही. बारामती हा तर त्यांचा गडच राहिला आहे. देशाच्या राजकारणात अनेक लाट्या आल्या पण पवारांनी आपला हा गड अभेद्य ठेवला.

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या व्यक्तीमत्त्वाचं त्यावेळी लोकांवर अक्षरश: गारूड होतं. ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली. लोकप्रिय पंतप्रधानांच्या हत्येनंतर देशभर मोठा आक्रोश करण्यात आला. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसचं नेतृत्व राजीव गांधी यांच्याकडे गेलं. डिसेंबर 1984 मध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या या निवडणुकीत भारतभर काँग्रेस पक्षाच्या बाजूने सहानभुतीची लाट होती. त्यामुळे या निवडणुकीत विरोधकांचा सूपडा साफ झाला आणि काँग्रेसला ऐतिहासिक बहुमत मिळालं.

या निवडणुकीत शरद पवार हे सोशिएलिस्ट काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते. म्हणजे ते राजीव गांधी यांच्या काँग्रेस पक्षाच्या विरोधात होते. पण एकीकडे देशभर काँग्रेसला ऐतिहासिक बहुमत मिळालेलं असताना बारामतीत मात्र पवारांनी ही लाट थोपवत विजय खेचून आणला होता.

2014 साली झालेल्या मागील लोकसभा निवडणुकीतही देशाने एक मोठी लाट पाहिली. तेव्हा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांना देशभर चांगलाच प्रतिसाद मिळत होता. या निवडणुकीचे निकालही तसेच लागले. भाजपने एकहाती बहुमत खेचून आणण्यात यश मिळवलं. या निवडणुकीत बारामतीतून स्वत: शरद पवार हे तर लढत नव्हते तर त्यांची कन्या सुप्रिया सुळे या रिंगणात होत्या. तर महायुतीत घटकपक्ष असलेल्या रासपचे महादेव जानकर हे सुप्रिया सुळेंना आव्हान देत होते. देशातील मोदीलाटेचा जानकरांना फायदा होईल, असा दावा केला जात होता. पण बारामतीकरांनी याही लाटेत राष्ट्रवादीच्या बाजूने कौल देत सुप्रिया सुळेंच्या पारड्यात मत टाकले आणि बारामती काबीज करण्याचं विरोधकांचं स्वप्न पुन्हा एकदा भंगले.


VIDEO : ...जेव्हा हजारो लोकांसमोर अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांसाठी गाणं गातात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 02:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...