धनगर आरक्षणाची घोषणा कधी? महादेव जानकर म्हणतात...

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा शिवाजी पार्कवर मेळावा होणार आहे. 24 फेब्रुवारीला होणाऱ्या या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 14, 2019 02:29 PM IST

धनगर आरक्षणाची घोषणा कधी? महादेव जानकर म्हणतात...

मुंबई, 14 फेब्रुवारी : महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा शिवाजी पार्कवर मेळावा होणार आहे. 24 फेब्रुवारीला होणाऱ्या या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी धनगर आरक्षणाची घोषणा होणार का, याबाबत महादेव जानकर यांना विचारला असता ते म्हणाले, 'मुख्यमंत्री 24 फेब्रुवारीला गुड न्यूज देतील.'

धनगर समाजाचा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रासपच्या मेळाव्यातच आरक्षणाची घोषणा केली जाऊ शकते, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.

जानकर पवारांना आव्हान देण्याच्या तयारीत

'भाजपानं जागा सोडल्यास शरद पवारांविरोधात निवडणूक लढवायला तयार आहे. महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी होणं जास्त आवडेल,' असं म्हणत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी थेट पवारांना आव्हान दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यानंतर आता जानकर यांनी लगेचंच पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. 'मी बारामती आणि माढा येथे निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दिला आहे,' असंही महादेव जानकर म्हणाले.

Loading...

'मुख्यमंत्री बारामतीची जागा सोडतील'

'बारामतीत कमळ फुलणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत असले तरीही आम्ही पाच मिनिटांच्या मुलाखतीत मतदार संघ आम्हाला मिळवू. सीएम आमचं म्हणणं ऐकतील याची मला खात्री आहे,' असा विश्वासही महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.

बारामती आणि शरद पवार

बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला. पण पवारांच्या याच बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणशिंग फुंकले आहे. येणाऱ्या निवडणुकीत बारामतीतून कमळ फुलणार, असा दावाच मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

शरद पवारांनी राजकारणात एंट्री केल्यानंतर विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्यांचा एकदाही पराभव झालेला नाही. बारामती हा तर त्यांचा गडच राहिला आहे. देशाच्या राजकारणात अनेक लाट्या आल्या पण पवारांनी आपला हा गड अभेद्य ठेवला आहे.


VIDEO : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आक्रमक, योजना कार्यालयात राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 02:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...