'मला धनगर आरक्षणापेक्षा पक्ष महत्त्वाचा', जानकरांचा फोन कॉल व्हायरल

एका धनगर तरुणाने महादेव जानकर यांनी धनगर आरक्षणाबाबतची विचारणा करण्यासाठी फोन केला. त्यानंतर जानकर यांनी त्या तरुणाला हे खळबळजनक उत्तर दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 9, 2018 04:00 PM IST

'मला धनगर आरक्षणापेक्षा पक्ष महत्त्वाचा', जानकरांचा फोन कॉल व्हायरल

बीड, 9 डिसेंबर : पशुसंवर्धन मंत्री आणि रासप अध्यक्ष महादेव जानकर यांची धनगर आरक्षणाबाबत एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे. 'मला धनगर आरक्षणापेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे, तुम्ही आधी पक्षाचं काम करा,' असं या ऑडिओ क्लिपमध्ये जानकर एका तरुणाला म्हणत आहेत.

एका धनगर तरुणाने महादेव जानकर यांनी धनगर आरक्षणाबाबतची विचारणा करण्यासाठी फोन केला. त्यानंतर जानकर यांनी त्या तरुणाला हे खळबळजनक उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

'मी जानकर यांना धनगर आरक्षणासाठी फोन केला होता. पण मंत्री असणाऱ्या जानकरांनी मला संतापजनक उत्तर दिलं. त्यांच्या या व्यक्तव्याचा आम्ही निषेध करतो,' अशी प्रतिक्रिया आता जानकर यांना फोन करणाऱ्या तरुणाने दिली आहे.

महादेव जानकरांचे स्पष्टीकरण

ऑडिओ क्लिपची राज्यभरात मोठी चर्चा झाल्यानंतर जानकरांनी आता याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 'पक्ष मोठा झाला पाहिजे आणि आरक्षण मिळाले पाहिजे. पक्ष वाढतोय म्हणून काहींच्या पोटात दुखत आहे. त्यांच्यासाठी माझ्याकडे ओवा आहे,' असा टोला स्पष्टीकरण देताना महादेव जानकर यांनी लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2018 03:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...