महाडच्या सावित्री नदीवरच्या पुलाचं पाच जूनला लोकार्पण

केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2017 05:49 PM IST

महाडच्या सावित्री नदीवरच्या पुलाचं पाच जूनला लोकार्पण

18 एप्रिल : येत्या पाच जूनला महाड जवळ असणाऱ्या सावित्रीच्या पूलाचं लोकापर्ण होणार आहे. पुलाचं बांधकाम आता अंतिम टप्प्यात आलंय. केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी काल (सोमवारी) ही माहिती दिली आहे.

गेल्या वर्षी 3 ऑगस्ट रोजी सावित्री नदीवरील पूल कोसळला होता. या दुर्देवी घटनेत एसटी बससह काही वाहने वाहून गेल्याने 30 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. आता दहा महिन्यानंतर, येत्या 5 जून रोजी हा पूल नागरिकांच्या वापरासाठी खुला करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

सरकारच्या आश्वसानानुसार हा पुल डिसेंबर 2016मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होतं. पुण्यातील टी अँड टी लिमिटेड या कंपनीने पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले होते.

नवीन पुलामध्ये अँटीक्रॅश बॅरियर आणि दोन्ही बाजूने एक मीटर रुंदीचा फूटपाथ असेल. 239 मीटर लांबीच्या तीन पदरी पुलाच्या बांधकामासाठी 27 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

 

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2017 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...