धक्कादायक! विहिरीत सापडले 5 मुलांचे मृतदेह तर 2 पत्नींसह वडील बेपत्ता

धक्कादायक! विहिरीत सापडले 5 मुलांचे मृतदेह तर 2 पत्नींसह वडील बेपत्ता

महाराष्ट्र सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशच्या बडवानीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बडवानीमध्ये एका विहिरीत 5 मुलांचे मृतदेह मिळाले आहेत. हे पाचही जण सख्खी भावंडं आहेत.

  • Share this:

पंकज शुक्ला, प्रतिनिधी

मध्य प्रदेश, 10 ऑक्टोबर : महाराष्ट्र सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशच्या बडवानीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बडवानीमध्ये एका विहिरीत 5 मुलांचे मृतदेह मिळाले आहेत. हे पाचही जण सख्खी भावंडं आहेत. यात आणखी गंभीर म्हणजे या मुलांचे आई-वडील हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहेत.

बडवानीतल्या सेंधवामधील चिखली गावातील ही घटना आहे. गावात राहणाऱ्या भत्तरसिंग याची ही 5 मुलं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भत्तरसिंग याच्या 2 पत्नी आहेत. त्याला पहिल्या पत्नीपासून 4 तर दुसऱ्या पत्नीपासून 1 अशी 5 मुलं आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून भत्तरसिंग दोन्ही पत्नींसह बेपत्ता आहे.

आज सकाळी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या काही स्थानिकांनी या 5 मुलांचे मृतदेह विहिरीत तरंगताना पाहिले. या संपूर्ण घटनेनंतर गावात खळबळ माजली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मध्य प्रदेश पोलिसांना देण्यात आली.

भत्तरसिंगची पहिली पत्नी ही वर्षभरापासून तिच्या माहेरी राहते तर तो त्याची 5 मुलं आणि दुसऱ्या पत्नीसोबत चिखली गावात राहतो. बऱ्याच दिवसापासून त्याचे त्याच्या पत्नीसोबत वाद सुरू होते आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Loading...

आपल्या पोटच्या 5 मुलांचा जीव घेऊन हे तिघेही फरार झाले असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. तर एकाच कुटुंबातील 5 भावंडांचे मृतदेह  गावच्या विहिरीत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या 5 जणांची हत्या करण्यात आली असावी किंवा त्यांनी घराच्या भांडणाला कंटाळून विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली असल्याचाही पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, हे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर पोलीस या बेपत्ता पालकांचा शोध घेत आहे.

VIDEO: धावत्या ट्रेनमधून उतरणे पडले महागात, फलाट तोडून काढले बाहेर पण...

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2018 11:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...