राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत 'उधारी बंद', याने लढवली अजब शक्कल

राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत 'उधारी बंद', याने लढवली अजब शक्कल

'आज नगद, कल उधार', असे बोर्ड आपण बहुतांश दुकानांमध्ये पाहिले असतील. मात्र माढा शहरातील एका सलुन व्यावसायिकाने उधारीला बगल देण्यासाठी चक्क काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अस्र म्हणून वापरले आहे. राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत 'उधारी बंद', अशी अजब शक्कल या सलून व्यावसायिकाने लढवली आहे.

  • Share this:

विरेंद्रसिंह उत्पट (प्रतिनिधी)

माढा, 15 मे- 'आज नगद, कल उधार', असे बोर्ड आपण बहुतांश दुकानांमध्ये पाहिले असतील. मात्र माढा शहरातील एका सलुन व्यावसायिकाने उधारीला बगल देण्यासाठी चक्क काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अस्र म्हणून वापरले आहे. राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत 'उधारी बंद', अशी अजब शक्कल या सलून व्यावसायिकाने लढवली आहे.

सचिन बाळासाहेब शेलार असं या नामी शक्कल लढवलेल्या सलून व्यावसायिकाचे नाव आहे. सचिन शेलार यांचे माढा इथे सलून पार्लर आहे. उधारीला कंटाळलेल्या सचिन यांनी त्यांच्या सलूनमध्ये राहुल गांधींचा फोटो लावला आहे. 'राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत उधारी बंद...', राहुल गांधींच्या फोटोखाली लिहिले आहे. या क्लुप्तीमुळे त्यांच्या व्यवसायावर चांगला परिमाण झाला असून उधारीही बंद झाली आहे.

सचिन शेलार यांनी दुकानातील काचेवर राहुल गांधींचा फोटो लावुन जोपर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत उधारी बंद, असा फलक लावला आहे. त्यामुळे सचिन शेलार हा व्यावसायिक चांगलाच चर्चेत आला आहेय यापूर्वी सांगलीच्या सलून व्यावसायिकांने सोन्याचा वस्तारा केल्याने तो राज्यभरात गाजला होता. त्यानंतर माढ्यातील शेलार यांने उधारीच्या कटकटीला कंटाळून राहुल गांधींचे अस्त्र वापरल्याने त्यांची व त्यांच्या दुकानांची चर्चा तर होणारच.. या बरोबरच शेलार यानी भारतीय लष्करातील आजी-माजी सैनिकांना पन्नास टक्के सवलत देखील दिली आहे. देशा प्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सचिन शेलार यांनी सांगितले.


VIDEO:अहमदनगरच्या तरुणाचा दिल्लीतील काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: madha
First Published: May 15, 2019 10:24 PM IST

ताज्या बातम्या