माढा लोकसभा निकाल LIVE : भाजपचा विजय निश्चित, राष्ट्रवादीला मोठा धक्का

माढामध्ये संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणजेच राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 06:53 PM IST

माढा लोकसभा निकाल LIVE : भाजपचा विजय निश्चित, राष्ट्रवादीला मोठा धक्का

माढा, 13 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली तोच हा माढा मतदारसंघ. शरद पवारांनी 2009 मध्ये माढातून निवडणूक लढवली तर 2014 मध्ये विजयसिंह मोहिते पाटील हे माढाचे राष्ट्रवादीचे उमेदवार होते.

यंदाच्या निवडणुकीत मात्र भाजपने या मतदारसंघात भाजपने मोठी मुसंडी मारली आहे.

ताज्या कलानुसार कुणाला किती जागा?

भाजप -रणजितसिंह नाईक निंबाळकर - 5,45,282

राष्ट्रवादी - संजय शिंदे - 4,69,995

Loading...

भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे 75,287 मताने आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.

दरम्यान, यावेळी शरद पवार माढामधून लढणार, अशी चर्चा होती पण शरद पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माढामधून राष्ट्रवादीतर्फे संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपतर्फे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे रिंगणात उतरले.

भाजपमध्ये प्रवेश

आधी काँग्रेसमध्ये असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमधल्या प्रवेशानंतर लगेचच त्यांना माढामधून उमेदवारी देण्यात आली.

माढामध्ये संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणजेच राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. इथे वंचित आघाडी आणि बहुजन मुक्ती मोर्चा या पक्षांनीही आपले उमेदवार उतरवले आहेत. माढामध्ये 23 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं.

2014 मध्ये राष्ट्रवादीचा विजय

मागच्या लोकसभा निवडणुकीत माढामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचा विजय झाला होता. विजयसिंह मोहिते पाटील यांना 4 लाख 89 हजार 989 मतं मिळाली तर त्यावेळी भाजपचे मित्रपक्ष म्हणून लढलेले सदाभाऊ खोत यांना 4 लाख 64 हजार 645 मतं मिळाली.

2009 मध्ये शरद पवारांचा विजय

2009 च्या निवडणुकीत माढामधून शरद पवारांचा विजय झाला होता. या लोकसभा मतदारसंघात करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण आणि माण हे विधानसभा मतदारसंघ येतात.

================================================================================


VIDEO : पार्थच्या पराभवामुळे आजोबा दुखावले, अजितदादांचा उल्लेखही टाळला!बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2019 04:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...