S M L

'एनडीए'त राहायचं की नाही याचा निर्णय घेण्यास शिवसेना स्वतंत्र - अमित शहा

शिवसेनेची एनडीएत राहण्याची तयारी नसेल तर तो निर्णय त्यांनी घ्यावा भाजप कुठल्याही परिस्थितीला सामोर जाण्यास तयार असल्याचं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लखनऊत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

Ajay Kautikwar | Updated On: May 25, 2018 10:21 PM IST

'एनडीए'त राहायचं की नाही याचा निर्णय घेण्यास शिवसेना स्वतंत्र - अमित शहा

लखनऊ,ता.25 मे: शिवसेना हा भाजपचा जुना मित्र असून 2019 ची लोकसभा निवडणूक शिवसेनेला सोबत घेऊन लाढायची आहे, मात्र शिवसेनेची एनडीएत राहण्याची तयारी नसेल तर तो निर्णय त्यांनी घ्यावा भाजप कुठल्याही परिस्थितीला सामोर जाण्यास तयार असल्याचं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लखनऊत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

शिवसेनेनं दूर जावू नये असाच आमचा प्रयत्न आहे. मात्र त्यांची तयारी नसेल तर निर्णय शिवनेनं घ्यावा असंही ते म्हणत त्यांनी बॉल शिवसेनेच्या कोर्टात टाकला. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आला तर भाजपसमोर ते मोठं आव्हान असेल अशी कबूलीही त्यांनी दिली.

2014 मध्येही अनेक पक्ष भाजपविरूध्द लढले होते मात्र विजय भाजपनेच मिळवला असंही त्यांनी स्पष्ट केलं. आंध्रप्रदेश, ओडिसा, केरळ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू या राज्यांमध्ये भाजप जास्त जागा मिळवेल असंही अमित शहा यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2018 10:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close