S M L

वर्ध्याचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकरांना परमविशिष्ट सेवा पदक

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये राजेंद्र निंभोरकरांनी मोठी कामगिरी बजावली होती.

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2018 11:18 PM IST

वर्ध्याचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकरांना परमविशिष्ट सेवा पदक

25 जानेवारी : वर्ध्याचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना परमविशिष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आलंय.

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये राजेंद्र निंभोरकरांनी मोठी कामगिरी बजावली होती. राजेंद्र निंभोरकर हे मुळचे वर्धा जिल्ह्यातल्या वडाळा गावचे रहिवासी आहेत. आतापर्यंत निंभोरकरांना त्यांच्या लष्कर सेवेतल्या योगदानासाठी विविध पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. शांतता काळातल्या अति विशिष्ठ कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

लेफ्टनंट राजेंद्र निंभोरकर यांचा अल्पपरिचयवर्धा जिल्ह्यातल्या वडाळा गावचे आहे. सध्या मास्टर जनरल ऑफ ऑर्डिनन्स पदावर कार्यरत आहे. भारतीय लष्करातले असे एकमेव अधिकारी आहेत ज्यांना लष्करातील कामगिरीसाठी आत्तापर्यंत सर्वाधिक आणि प्रत्येक टप्यावरचं पदक मिळालेलं आहे.

राजेंद्र निंभोरकर यांनी राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि भारतीय लष्करी अकादमीमध्ये शिक्षण घेतलंय. यापूर्वी लेह,कारगिल, काश्मिर खोरं, पूंछ- राजौरी, भारतीय वाळवंट एवढंच नाही तर पूर्वोत्तर राज्यांमध्येही काम केलं आहे. ऑपरेशन विजयच्या दरम्यान मोठ्याप्रमाणात जखमी होऊनही त्यांनी माघार घेतली नाही. यापूर्वी राजेंद्र निभोरकर यांना सेना मेडल, विशिष्ठ सेवा मेडल, उत्तम योद्धा मेडल, अति विशिष्ठ सेवा मेडल मिळाले आङे. युनोच्या अंगोला इथल्या शांती सेनेचं त्यांनी नेतृत्व केलंय. नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी, वॉशिंग्टन आणि हवाई इथे त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि दिलंय.

विशेष म्हणजे संपूर्ण निंभोरकर कुटुंब देशाच्या सेवेत आहे. राजेंद्र निंभोरकर यांचे लहान भाऊ भारतीय हवाई दलात आहेत तर मोठे भाऊ भारतीय नौदलातून निवृत्त झाले. निंभोरकर यांची मुलगी भारतीय नौदलात डॉक्टर आहे तर जावई नौदलात अधिकारी दुसरी मुलगी एअरोस्पेस आणि सुरक्षा क्षेत्रात काम करते तर पत्नी शीला निंभोरकर आर्मी वेलफेअर असोसिएशनमध्ये सक्रीय आहेत. .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2018 11:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close