News18 Lokmat

नाशिक आणि औरंगाबाद गारठलं; राज्यात हु़डहुडी आणखी वाढणार

गेल्या 24 तासात नाशिक येथे सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली. नाशिकचा पारा 9.6 अंशापर्यंत खाली आला होता. तर औरंगाबदेत 9.8 अंश सेल्सीयस किमान तापमान नोंदविल्या गेलं.

News18 Lokmat | Updated On: Dec 13, 2018 06:03 PM IST

नाशिक आणि औरंगाबाद गारठलं; राज्यात हु़डहुडी आणखी वाढणार

पुणे, 13 डिसेंबर : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा चांगलाच वाढला आहे. गेल्या 24 तासात नाशिक येथे सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली. नाशिकचा पारा 9.6 अंशापर्यंत खाली आला होता. तर, त्याच खालोखाल औरंगाबदेत 9.8 अंश सेल्सीयस किमान तापमान नोंदविल्या गेलं. राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तापमान १० अंशांच्या खाली घसरल्याने नाशिक, औरंगाबादसह नगरचं तापमान आणखी खाली घसरून बुधवारी (ता. १२) हंगामातील नीचांकी ८.२ अंशांवर आलं. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ८.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. जळगाव, पुणे, नागपूरचं किमान तापमानसुद्धा 10 अंशाच्या जवळपास होतं. बुधवारी जळगावात 10, पुण्याचं 10.5 तर नागपूरात 10.9 अंशा सेल्सीयस किमान तापमानाची नोंद झाली.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान होतं. कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर, गडचिरोलीसह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावल झाला. पावसाला पोषक हवामान निवळल्यामुळे राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. किमान तापमानात घट झाल्यामुळे गारढा वाढायला पुन्हा सुरूवात झाली आहे. राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास असून, बुधवारी काही ठिकाणी 1 ते 5 अंशांची घट झाली आहे.  कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ककंचित घट झाली आहे. राज्याच्या ककमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.


बुधवारी राज्यातील विविध ठिकाणचं किमान तापमान असं होतं..

Loading...

मुंबई (कुलाबा) 21.0

मुंबई (सांताक्रूज) 18.4

अलिबाग 18.7

रत्नागिरी 15.8

पणजी (गोवा) 19.0

डहाणू 18.7

पुणे 10.5

अहमदनगर -

जळगाव 10.0

कोल्हापूर 15.8

महाबळेश्वर 13.0

मालेगाव 11.8

नाशिक 9.6

सांगली 12.3

सातारा 11.2

सोलापूर 15.6

उस्मानाबाद -

औरंगाबाद 9.8

परभणी 13.2

नांदेड 14.5

नागपूर 10.9

अकोला 12.3

अमरावती 13.2

बुलडाणा 12.6

ब्रम्हपूरी 14.2

चंद्रपूर 19.2

गोंदिया 14.5

वर्धा 14.6

यवतमाळ 14.4


 VIDEO: नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेना पेटली, रिफायनरीचे बॅनर फाडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2018 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...