Elec-widget

एकतर्फी प्रेम..लग्नाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीवर चाकू हल्ला

एकतर्फी प्रेम..लग्नाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीवर चाकू हल्ला

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर भररस्त्यावर चाकूने वार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बावडा येथे बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. मित्तल असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. मारेकरी मित्तलवर एकतर्फी प्रेम होते.

  • Share this:

अहमदाबाद, 9 मे- एकतर्फी प्रेमातून तरुणीवर भररस्त्यावर चाकूने वार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बावडा येथे बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. मित्तल असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. मारेकरी मित्तलवर एकतर्फी प्रेम होते. केतन वाघेला असे त्याचे नाव असून तो मित्तलच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि पर्समधील रोख रक्कम घेऊन फरार झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.

मित्तल हिचे लग्न ठरले होते. येत्या 26 मे रोजी मित्तलचे लग्न होते. त्यामुळे केतन नाराज झाला होता. लग्नाच्या खरेदीसाठी मित्तल घराबाहेर पडली होती. केतन याने तिचा पाठलाग केला. अचानक तिच्या समोर येऊन तिच्यावर चाकूने वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. परंतु तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मारेकऱ्याला आमच्या समोर आणा..

मारेकऱ्याला आमच्या समोर आणत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घे नाही, असा पवित्रा मित्तल हिच्या नातेवाईकांनी घेतला आहे.

बाईकवर बसण्यास नकार देताच चाकूने केले वार..

Loading...

26 मे रोजी मित्तलचे लग्न होते. ती बाजारात ब्लाऊज शिवण्यासाठी गेली होती. संजीवनी हॉस्पिटलसमोर केतनसह तिघे बाईकवर आले. केतनने मित्तलला जबरदस्तीने बाईकवर बसण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने नकार देताच त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.


प्रेयसीचे ठरले लग्न, प्रियकराने भररस्त्यावर चाकूने केले सपासप वार LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2019 07:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...