लोणावळ्याच्या मर्डरला पाच दिवस पूर्ण, आरोपींचा अजूनही मोकाटच

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2017 12:35 PM IST

लोणावळ्याच्या मर्डरला पाच दिवस पूर्ण, आरोपींचा अजूनही मोकाटच

07  एप्रिल : लोणावळ्यात हत्या झालेल्या सार्थकच्या गावकऱ्यांनी आज गाव बंद ठेवून निषेध मोर्चा काढला होता. पाच दिवस उलटूनही मारेकऱ्यांचा तपास लागत नसल्याने पोलीसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अशा प्रकारच्या अनेक घटना घडूनही काॅलेज प्रशासन बदनामीच्या भितीने दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सार्थक आणी श्रृतीचा पाच दिवसापुर्वी लोणावळ्यात संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. आज पाच दिवस उलटूनही पोलिसांना काहीच धागेदोरे मिळत नसल्याने सार्थकचे गावकरी संतप्त झाले आहेत.

त्याच्या निषेधार्थ सार्थक राहत असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सात्रळ गावात आज सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तसंच गावातून निषेधमोर्चा काढण्यात आला होता. लवकरात लवकर मारेकऱ्यांना पकडून सार्थकच्या कुटूंबियांना न्याय देण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2017 12:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...